google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचा आदेश ; कोरोना अंतर्गत विभागांना दिल्या या सूचना

Breaking News

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचा आदेश ; कोरोना अंतर्गत विभागांना दिल्या या सूचना

 निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचा आदेश ; कोरोना अंतर्गत विभागांना दिल्या या सूचना



सोलापूर : कोविड आजाराने निधन पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह साहाय्य अनुदान प्रदान करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बुधवारी आदेश काढून सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.


महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविङ १९ या आजाराने निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रूपये ५०,०००/- ( रू. पन्नास हजार) इतकी मदतनिधी वितरीत करणेकामी शासनाने मान्यता दिली आहे. हे सहाय्य मिळणेकरिता कोविड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकान राज्य शासनाने विकसित केलेल्या http://mahacovld 1grelief.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण आवश्यक राहील यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV गधून अर्ज करू शकेल.


हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील. १. अर्जदाराचा स्वतःचा तपशील आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक


२. अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील


३. मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील


४. मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र


५. इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र,


मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोव्हिड १९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील व्यक्तीच्या विदामध्ये (Data) उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यारा हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप (Automatically) स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. ज्या अर्जदाराकडे मृत व्यक्तींचा आधार तपशील नसेल किंवा हा आधार क्रमांक वरील नमूद Data base मध्ये उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Meclical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक / म.न.पा. क्षेत्रातील


मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविणेत येईल. हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात कोविड १९ हे मृत्यूचे कारण नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा अर्ज स्वीकृत करतील. वरीलप्रमाणे शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.


याबाबतची आवश्यक ती प्रसिध्दी तालुका / गाव पातळीवर देण्यात यावी. आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करणेत यावे. तसेच वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणेकामी तालुका / गाव पातळीवर आपले सरकार सेवा केंद्रात / सेतू सुविधा केंद्रामध्ये कॅम्पचे आयोजन करणेत यावे. व तालुक्यातील सर्व कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांचे ऑनलाईन अर्ज मोफत भरून घेणेत यावे यासाठी स्वतंत्र खिडकी / कक्षाची स्थापना करणेत यावी. यामध्ये कोणतीही व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments