google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा केला लिलाव ? ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ?

Breaking News

राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा केला लिलाव ? ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ?

 राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा केला लिलाव ? ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ?


राज्य उत्पादन शुल्क विभाग हे उघडपणे जनतेसमोर कसे व कधी सादर करणार ? मग ताडी विक्री दुकानदार आपल्या लिलावाची रक्कम व नफा कमविण्यासाठी कुठलाही विचार न करता मानवी शरीरास अतिशय घातक अशी रासायनीक पदार्थ क्लोरल हायड्रेट मिश्रीत करुण ताडी विक्री करणार का?


राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा केला लिलाव ? ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ? ही बाब खुपच धक्कादायक राज्य उत्पादन शुल्क पर्याप्त झाडे व ताडी विक्री परवाने यांचा मेळ जनतेसमोर सादर करणार का? कधी? धुळे नंदूरबार नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी जिल्ह्यातील एकूण १८ ताडी दुकानांचे लिलाव केलेले आहेत.प्रत्यक्ष ग्रामीण व शहर भागातील दुकानासाठी परिसरात शुध्द ताडीसाठी आवश्यक इतकी शिंदी व ताड माड ही झाडे उपलब्ध नसतांना दुकान चालवन्याची परवानगी कशी देण्यात आली ? प्राप्त माहिती नुसार ग्रामीण भागासाठी एका दुकानासाठी ५०० झाडे तर शहरी भागातील दुकनासाठी १००० झाडे आवश्यक आहेत, असे असतांना राज्य उत्पादक शुल्क विभागाने कोणत्या नियमाने शहर व ग्रामीण भागासाठी दुकानांचा लिलाव केलेला आहे.


याचा नियमात बसत नाही याचा हिशोष व मेळ राज्य उत्पादन शुल्क विभाग हे उघडपणे जनतेसमोर कसे व कधी सादर करणार ? मग दुकानदार आपल्या लिलावाची रक्कम व नफा कमविण्यासाठी कुठलाही विचार न करता मानवी शरीरास अतिशय घातक अशी रासायनीक पदार्थ क्लोरल हायड्रेट मिश्रीत ताडी विक्री करून आपले दुकान चालवणार नाहीत तर मग काय करणार? यापुर्वी ताडी विक्री लिलाव हे पुरेशी ताडीचे झाडे उपलब्ध आहेत अश्या व्यक्तीनांच ताडी विक्रीचे परवाने दिली जात होते.मात्र यावेळेस झालेल्या लिलावातील देण्यात आलेले परवाने धारकांकडे ताडीचे झाडे नसतांना देखील कसे काय परवाने दिलीत ? ही बाब खुपच धक्कादायक आहे.


इतकेच नव्हे तर ज्यांना परवाने देण्यात आलीत त्यांच्याकडे टी.डी.-१ परवान्यासाठी आवश्यक त्या अटी शर्तीची पुर्तता करून घेतलेली असते.मग असे असतांना जाग उपलब्ध न होणे,पर्याप्त झाडे उपलब्ध नसने ही एक शोकांतिका आहे.खरे पहाता ताडी दुकान परवान्यासाठी लिलाव बोलीपुर्वीच प्रस्तापित दुकानासाठीची चतु:सिमा नमुद करावी लागते.


सदर अनुज्ञप्ती मध्ये त्याच्याकडे उपलब्ध झाडांची माहिती देणे व त्यांचा ७/१२ उतारा देणे आवश्यक असून त्याबाबतची प्रयोगात्मक तपासणी विभागामार्फत करु घेण्यात येते.राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी विक्री दुकानासाठी पुरेशी अशी कोणत्या झाडांची प्रयोगात्मक तपासणी विभागामार्फत करुण घेण्यात आलेली दिसुन येत नाही.


धुळे नंदूरबार नाशिक विभागातील लिलाव झालेल्या जिल्ह्यात ताडीच झाडे आहेत तरी कीती? जथे झाडे आहेत ते परिपक्क नाहीत,परिपत्रता असलेल्या एका झाडांकडून वर्षाकाठी एकशे सत्तर लिटर ताडी मिळणे आवश्यक आहे या प्रमाणे पाहिल्यास अतिशय कमी प्रमाणात ताडी उपलब्ध होणार आहे अशी परिस्थिती असतांना शहरात व ग्रामीण भागात वाजवी पेक्षा जास्त ताडी विक्री दुकाने सुरू नेमके कसे करणार हा प्रश्न जनते समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments