google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्राच्या नवीन निकषाने घरकुलाचे स्वप्न भंगणार : तर एकही घरकूल मंजूर होणार नाही टीव्ही , पंखा असल्यास घरकुलाचे स्वप्न भंगेल

Breaking News

केंद्राच्या नवीन निकषाने घरकुलाचे स्वप्न भंगणार : तर एकही घरकूल मंजूर होणार नाही टीव्ही , पंखा असल्यास घरकुलाचे स्वप्न भंगेल

 केंद्राच्या नवीन निकषाने घरकुलाचे स्वप्न भंगणार : तर एकही घरकूल मंजूर होणार नाही टीव्ही , पंखा असल्यास घरकुलाचे स्वप्न भंगेल


लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन निकष जाहीर केले आहे . त्यात टीव्ही , पंखा असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ देऊ नये अशा सूचना केल्या आहे . घरकुल मंजूर करण्यासाठी एकूण १३ निकष लागू केले असून , यानुसार एकाही लाभार्थ्याला घरकुल मिळणे शक्य नाही . त्यामुळे पंतप्रधानांचे २०२२ पर्यंत घरकुलाचे स्वप्न पूर्ण अवघडच आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे आश्वासन दिले . यासाठी पंतप्रधान आवास योजनेसह विविध घरकुल योजना राबविल्या जात आहे . पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करताना केंद्र शासनाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला १३ निकष लागू केले आहे . यानंतर सर्व पंचायत समित्यांना घरकुल मंजूर करताना या १३ निकषात बसणाऱ्याच घरकुल मंजूर करण्याचे निर्देश दिले आहे . या १३ निकषांमुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरत असून , त्यांचा प्रपत्र ड यादीत समावेश केला जात आहे . सद्य : स्थितीत गोरगरिबाच्या झोपडीत पंखा आणि टीव्ही आहे . इतर वस्तू नसल्या तरी या दोन वस्तूंमुळे झोपडीत राहणाऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्णपणे भंगणार आहे . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांना घरे हे आश्वासन पोकळच ठरणार आहे . या १३ नवीन निकषांमुळे घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व्याप्त आहे .

Post a Comment

0 Comments