आम्ही पोहेकर या उद्योगाला सांगोलकर भरभरून प्रतिसाद देतील- आ . शहाजीबापू - सांगोला येथे आम्ही पोहेकर शाखेचे शानदार उद्घाटन
सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यात सय्यद कुटुंबीयांनी आज एक वेगळ्या पद्धतीचा उद्योग सुरू केला आहे . सय्यद कुटुंबीयांनी एक वेगळा प्रयोग केला असून या प्रयोगाला सांगोलकर नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास अॅड . शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त करून नवीन उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या पुण्यातील सुप्रसिद्ध आम्ही पोहेकर यांच्या २० व्या सांगोला शाखेच्या उद्घाटन समारंभ सोहळा रविवार दि . ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायं . ६:३० वा . एसटी स्टैंड समोर , भोपळे रोड , सांगोला येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न उद्घाटनप्रसंगी झाला . या आ . शहाजीबापू पाटील बोलत होते . व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पी . सी . झपके सर युवक नेते डॉ . अनिकेत देशमुख , माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ , माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला उपस्थित होते . यावेळी डॉ . अनिकेत देशमुख म्हणाले की , सय्यद परिवाराचा हा धाडसाचा निर्णय असून त्या निमित्त त्याचे अभिनंदन करून चवदार पोहेची चव आता सांगोलकरानाही पुणे प्रमाणे चाखायला मिळणार आहे . सांगोलाकरांचा मोठा प्रतिसाद या नवीन शाखेला मिळणार असून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे सांगून शुभेच्छा दिल्या . पी.सी. झपके सर म्हणाले , पोहेचे अतूट नाते घरोघरी आहे . त्यामुळे सांगोलकर चव चाखल्याशिवाय राहणार नाहीत . या उद्योगात सय्य्द कुटुंबिय निश्चितपणे यश मिळवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून नवीन उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या . सदरच्या उद्घाटन सोहळ्यास उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत , डॉ . बाबासाहेब देशमुख डॉ . पियुषदादा साळुंखे - पाटील ,प्रा . संजय देशमुख सर यांच्यासह शिक्षक बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार अमन सय्यद यांनी मानले . पोहे हा नाष्ट्यामध्ये खाल्ला जाणारा प्रमुख भारतीय पदार्थ आहे . बऱ्यापैकी भारतीयांची नाष्ट्यामध्ये पहिली पसंती पोहे असते . भारताच्या प्रांता प्रांतामध्ये पोहे बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत , जसे महाराष्ट्राच्या काही भागात कांदे पोहे , विदर्भामध्ये तरीं पोहे , इंदोर मध्ये इंदोरी पोहे , कोकणामध्ये कोकणी पोहे , दडपे पोहे ' इत्यादी पोह्यांचे अनेक प्रकार बनविले जातात . मुळात पोह्यांचे विविध प्रकार जर एकाच ठिकाणी आणि स्वच्छ जागी उपलब्ध झाले तर ग्राहकांना ते सोयीस्कर होऊ शकतं , हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही पोहेकर हा ब्रँड बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाला . पोहे बनविण्याच्या प्रकारात नाविन्यता आणून आम्ही पोहेकर ' च्या माध्यमातून पोह्यांचे १५ हून अधिक नवीन प्रकार आम्ही खवय्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत . लोकांना उत्कृष्ट दर्जेदार आणि चविष्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आणि पोह्यांचे विविध पदार्थ देण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या काही वर्षात आम्ही पुणे तसेच संबंध भारतभर आमची पोह्यांची चव पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत . तसेच आम्ही पोहेकर च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विक्रितील काही हिस्सा भारतीय जवानांसाठी निधी उपलब्ध करणार आहोत . भविष्यामध्ये कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी किमान पैशांमध्ये पोटभर जेवण उ ब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे अमन सय्यद यांनी सांगितले . १५ हून अधिक प्रकारच्या पोह्यांची मेजवानी आता सांगोला येथे मिळणार आहे .
0 Comments