अभिनंदन, 'तहसीलदार' मोनिका कांबळे !
पुणे महापालिकेतील मातंग समाजाचे सफाई कर्मचारी श्री. रोहिदास कांबळे यांची कन्या कु. मोनिका कांबळे यांनी MPSC परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करत 'तहसीलदार' या पदाला गवसणी घातली. हे यश आपल्या सर्वांसाठीच कौतुकाचं आणि प्रेरणादायी आहे. मोनिकाचं आणखी एक कौतुक म्हणजे त्या MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये सलग चौथ्यांदा यशस्वी झाल्या.
प्रतिकूल परिस्थिती असतानाही मोनिकाने चार वेळा मिळवलेले यश नक्कीच तिच्या उत्तम बुद्धीमत्तेची, जिद्दीची व कष्टाची साक्ष देणारे आहे. जिद्द आणि कठोर मेहनत घेऊन अभ्यास केल्यास यश हमखास मिळते हे मोनिकाने दाखवून दिले आहे. 'जिल्हाधिकारी'. होण्याच्या स्वप्नाचा ती नक्कीच यशस्वी पाठलाग करेल, हा विश्वास आहे.


0 Comments