google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिलीपराव इंगोले सर यांचा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांच्याकडून सत्कार संपन्न

Breaking News

दिलीपराव इंगोले सर यांचा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांच्याकडून सत्कार संपन्न

 दिलीपराव इंगोले सर यांचा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांच्याकडून सत्कार संपन्न


सह्याद्री कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव इंगोले यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले . त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांच्याकडून त्यांचा काल 2 ऑक्टोंबर रोजी सत्कार करण्यात आला . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाय फुले , शाहू , आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा चालवत त्यांनी सर्व धर्म समभाव हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले . त्यामुळे त्यांना अल्पावधीत मध्ये नाव लौकिक आले .

त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कोणत्याही जातीव्यवस्थेला थारा नाही अशी त्यांच्या विषयी माहिती सत्कार करतेवेळी बापूसाहेब ठोकळे यांच्याकडून सांगण्यात आली . सत्कार समारंभ वेळी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे , दीपक ऐवळे , इंजिनिअर अमर चंदनशिवे , अनिकेत चंदनशिवे , अरुण चंदनशिवे , रमाई चंदनशिवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments