google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 "धवलसिंह" महिनाभर पिंजून काढणार जिल्हा ; तालुक्यांमध्ये मुक्कामी राहून आढावा, कोणता तालुका कधी? पहा

Breaking News

"धवलसिंह" महिनाभर पिंजून काढणार जिल्हा ; तालुक्यांमध्ये मुक्कामी राहून आढावा, कोणता तालुका कधी? पहा

 "धवलसिंह" महिनाभर पिंजून काढणार जिल्हा ; तालुक्यांमध्ये मुक्कामी राहून आढावा, कोणता तालुका कधी? पहा


सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर लगेच आठ दिवसात सगळ्या तालुक्यांच्या पदाधिकार्‍यांची आढावा बैठक काँग्रेस भवनामध्ये घेतली. यावेळी ही केवळ ओळख परेड असून त्या-त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन मी पक्षाचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून जिल्हा दौऱ्याचे नियोजन त्यांनी केले, 


यानंतर ही संकल्पना त्यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांना सांगितली. विशेष करून दोन्ही नेत्यांना धवलसिंहांची ही संकल्पना अतिशय आवडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या जिल्हा दौरा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.


संपूर्ण एक महिना ते जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये गावोगावी जाऊन आढावा घेणार आहेत, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वेळ पडल्यास त्याच तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम राहणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्‍यातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गण निहाय त्यांचा दौरा असणार आहे त्यांनी आपला जिल्हा दौरा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून यामध्ये कोणता तालुका कधी असणार आहे हे पहा 

1.दक्षिण सोलापूर 4 ते 6 ऑक्टोबर,

2.मंगळवेढा 8 ते 10 ऑक्टोबर,  

3. मोहोळ 11 ते 13 ऑक्टोबर, 

4.  उत्तर सोलापूर 14 व 16 ऑक्टोबर, 

5.माळशिरस 17 ते 21 ऑक्टोबर, 

6. सांगोला 22 ते 24 ऑक्टोबर,   

7. बार्शी 27 ऑक्टोबर, 

8.करमाळा 28 व 29 ऑक्टोबर, 

9.अक्कलकोट 30 व 31 ऑक्टोबर, 

10. माढा 25 व 26 ऑक्टोबर, व 

11. पंढरपूर 1 व 2 नोव्हेंबर

Post a Comment

0 Comments