google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण अशी बैठक आज हर्षदा लॉन्स सांगोला येथे पार पडली .

Breaking News

सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण अशी बैठक आज हर्षदा लॉन्स सांगोला येथे पार पडली .

 आज सांगोला येथे ... महाविकास आघाडीची बैठक संपन्न सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण अशी बैठक आज हर्षदा लॉन्स सांगोला येथे पार पडली .


या बैठकीस शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व सर्व प्रमुख नेते उपस्थित होते . या बैठकीत एकमताने एक दिलाने सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगोला नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला . या बैठकीस सांगोला तालुक्याचे लाडके आमदार साहेब आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब , मा.आ.दिपक आबा साळुंखे - पाटील , उद्योगपती श्री . भाऊसाहेब रुपनर , माजी नगराध्यक्ष रफीकभई नदाफ , श्री . तानाजी काका पाटील , प्राचार्य संजय देशमुख , शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले .


सांगोला तालुक्याचे लाडके आमदार मा . श्री शहाजीबापू पाटील यांच्यातर्फे विमा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा MDRT 2021-22 हा पुरस्कार मिळवल्याबद्दल श्री . रमेश गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.पी.सी. झपके सर व फॅबटॅक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा . श्री . भाऊसाहेब रूपनर साहेब उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments