स्व . आबासाहेबांनी बहुजनांना शेकापक्षाच्या माध्यमातुन विविध पदावरती संधी दिली - भाई चंद्रकांत सरतापे
महुद ( वार्ताहर ) : सध्या देशात राज्यात राजकारणामध्ये आमुलाग्रह बदल होताना दिसत आहे . राजकारणात वारेमाप पैशाचा वापर होताना दिसत आहे . पैशातुन सत्ता व सत्तेतुन पुंन्हा पैसा हे सुत्रच बहुतांश ठिकाणी पहावयास मिळत आहे . अशामुळे सर्व स्तरातील लोकांना संधी मिळणे कठीण होत असताना
स्व . गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातुन अनेक संस्था व अनेक सत्तास्थानावरती सर्व जाती - धर्माच्या व वेगवेगळ्या समुहाच्या लोकांना संधी देऊन राज्यात एक आदर्श घालुन दिला आहे . सत्ता ही जनसेवेसाठी वापरायची व त्यातुन शेवटच्या घटकाचा विकास साधायचा ही परंपरा शेकापक्षाची आहे हे आबासाहेबांनी दाखवून दिले . खेडे गावापासुन शहरापर्यंत व तालुक्यापासुन जिल्ह्यापर्यंत त्यांनी अनेक लोकांना संधी उपलब्ध करून दिल्यात .
तसेच या संधीपेक्षा महत्वपुर्ण अशी पध्दती गावोगावी व वरिष्ठ पातळीवरती शेकापक्षामध्ये आवलंबली जाते ती म्हणजे सगळ्यांनी एकत्रीत येऊन निर्णय घेणे , मग तो निर्णय संघटनेबाबत असेल किंवा विकास कामाबाबत असेल तो सामुदाईक स्वरुपाचाच असतो व त्या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक गावचे वेगवेगळ्या जातीचे नेते कार्यकर्ते असतात . ते सर्व मिळुनच निर्णय घेतात . म्हणजे महत्वपुर्ण अशा निर्णय प्रक्रियेत सुध्दा सर्वांना संधी शेकापक्षामध्येच दिली जाते . शेतकरी कामगार पक्षाचा मुळ पाया हा शेतकरी , कष्टकरी , दलीत , महिला , लहान व्यापारी यांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे हा आहे . ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना वैचारीक अधिष्ठानावरती निस्वार्थपणे काम केले जाते . . शेकापक्षामध्ये टिका टिप्पणीला महत्व दिले जात नाही . प्रश्नांची सोडवणुक करण्यावरती भर दिला जातो . निवडणुका लढवणे हे एकमेव ध्येय शेकापक्ष बाळगतच नाही . सत्ता असो या नसो काम करीत रहाणे , ही पध्दती शेकापक्षाची आहे . व त्यानुसारच युवा नेते डॉ . बाबासाहेब देशमुख व डॉ . अनिकेत देशमुख हे जनसेवेचा वसा घेऊन जेष्ठ नेते भाई चंद्रकांत ( दादा ) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या घटकाचा विकास व्हावा म्हणुन काम करीत आहेत .
शेकापक्षामध्ये वैचारीक , अभ्यासु काम करण्याची उर्जा असणारे नेते अनेक स्व आबासाहेबांनी शेकापक्षाच्या माध्यमातुन तयार केलेत . त्यामध्ये स्व . जगन्नाथ ( तात्या ) लिगाडे , स्व . वसंतराव पाटील , स्व . जगन्नाथ कोळेकर असे सहकारी निर्माण केले . तसेच एखाद्या आमदार , खासदाराच्या कामाच्या बरोबरीने काम करणारे अनेक जातीतील नेते तयार केले . त्यामध्ये भाई विठ्ठलराव शिंदे , भाई नानासाहेब लिगाडे , भाई पी . डी . जाधव , भाई बाबासाहेब करांडे , भाई संगम धांडोरे , भाई तानाजी चंदनशिवे , भाई दादाशेठ बाबर , भाई सचिन देशमुख , भाई मारुती ( आबा ) बनकर , भाई सुरेश ( आप्पा ) माळी , भाई रफिक तांबोळी , भाई बाळासाहेब एरंडे , भाई बाळासाहेब पाटील , भाई मारुती ढाळे , तसेच
सौ . राणीताई कोळवले , श्रीमती कुमठेकर मँडम , श्रीमती कल्पनाताई शिंगाडे , सौ . संगीता धांडोरे , सौ . श्रुतीका लवटे , सौ . मायाक्का यमगर अशी अनेक नावे वेगवेगळ्या जातीची घेता येतील ही नावे अभ्यास व वैचारीकता यांनी ठासुन भरलेली आहेत . स्व . आबासाहेबांनी अशा प्रकारे मराठा , दलित , ओबीसी व बहुजनांना अनेक ठिकाणी संधी दिल्या आहेत . हीच परंपरा शेकापक्ष पुढेही चालु ठेवणार आहे कारण शेकापक्षाची ही परंपराच आहे .

0 Comments