google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : महिन्यात मिळणार बांधकाम परवाना

Breaking News

सोलापूर : महिन्यात मिळणार बांधकाम परवाना

सोलापूर : महिन्यात मिळणार बांधकाम परवाना


 सोलापूर : शहरातील कोणत्याही नगरात नव्याने बांधकाम करताना आता महापालिकेतील कोणत्याही कार्यालयाचा दरवाजा ठोठावण्याची गरज भासणार नाही. बांधकाम परवान्यासंबंधीच्या नव्या नियमावलीसह एक स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.त्यातून अर्जदाराला तीस दिवसांत बांधकाम परवाना देणे बंधनकारक असणार आहे.


शहरात आता बहुमजली इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नव्या नियमावलीनुसार काही बदल झाले असून त्या सर्व नियमांवर आधारित बांधकाम परवान्यासाठी महापालिकेने एक स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे अपडेशन पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून नागरिकांना बांधकाम परवाना घरबसल्या मिळणार आहे.


त्यासाठी आर्किटेक्‍चर तथा अभियंत्याने त्या इमारतीचे डिझाईन ऑनलाइन पध्दतीने बांधकाम परवान्यासाठी त्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. त्यानंतर त्या अर्जाची छाननीदेखील ऑनलाइन पध्दतीनेच केली जाणार आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात कागदपत्रे व नियमाला धरून बांधकामाचे डिझाईन नसल्यास ते सॉप्टवेअरमध्ये स्वीकारलेच जाणार नाही. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधिताच्या मोबाइलवर एक मेसेज जाणार आहे. बांधकाम परवान्यासाठी त्या व्यक्‍तीला ऑनलाइन शुल्क भरावे लागेल. 'टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट'मार्फत हे काम हाताळले जाणार आहे. काही दिवसांत त्या सॉफ्टवेअरचे अपडेशन पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम स्वरुप प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन बांधकाम परवाना देण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments