google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गांजा विक्रेत्याला अकलूज पोलिसांनी केली अटक अवैध धंद्यावर कारवाईचा अकलूज पोलिसांचा सपाटा

Breaking News

गांजा विक्रेत्याला अकलूज पोलिसांनी केली अटक अवैध धंद्यावर कारवाईचा अकलूज पोलिसांचा सपाटा

 गांजा विक्रेत्याला अकलूज पोलिसांनी केली अटक 


अवैध धंद्यावर कारवाईचा अकलूज पोलिसांचा सपाटा

अकलूज तालुका माळशिरस ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत अकलूज पोलिसांनी हद्दीमधील सर्व बेकायदा धंदे उध्वस्त करून संबंधितांवर  कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे तसेच बेकायदा धंदे करणाऱ्यांना  समुपदेशन करून, कारवाई करून किराणा दुकाने, चहाचे स्टॉल, पिठाची चक्की असे  इतर वैद्य व्यवसाय करण्यासाठी मदत केली आहे. आज  अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावंकर यांना, नागोबाचे  मंदिराच्या कटयाजवळ जुना बाजारतळ विकास नगर येथील पत्राषेडमध्ये एक इसम गांजाची विक्री करत असलेबाबत खास गुप्त यंत्रणेद्वारे बातमी  मिळताच लगेच बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांना कळवून पोलीस स्टाफ, इलेक्ट्राॅनिक वजन काटा, लेखणी साहित्य, पंच, संपूर्ण सीलचे साहित्य असे नागोबाचे मंदिराचे कटयाजवळ जुना बाजारतळ विकासनगर येथे गेलो असता पत्राषेडमध्ये एक इसम पांढरे रंगाची पिषवी घेवून बसलेला दिसला. 


सदर इसमास जागीच पकडून त्याचे नांव विचारले असता शंकर  देविदास पिसाळ वय 45 वर्ष रा. नागोबाचा कट्टा, जुना बाजारतळ, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर याने त्याचे ताब्यातील  पिशवीमध्ये 12,750/- रुपये किंमतीचा मोकळा 850 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा व 1,320/- रुपये किंमतीचा 9 लहान प्लॅस्टीक  पिशव्यांमध्ये पॅक केलेला 88 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा असा एकुण 14,070/- रुपये किंमतीचा 938 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुध्द एन. डी. पी. एस. कलम 8(क), 20(ब)(पप)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


सदरची कारवाई  सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक, तेजस्वी सातपुते मॅडम, हिमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, बसवराज  शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांचे  मार्गदर्शनाखाली  धडाकेबाज पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर, स.पो.नि. सुनिल जाधव, मपोसई सारिका  शिंदे, ए.एस.आय. बबन साळुंके, पोहेकाॅ/409 सुहास क्षिरसागर, पोहेकाॅ/382 रामचंद्र चैधरी, पोना/1825 निलेष  काशीद, पोना/999 सोमनाथ कोळी, पोकाॅ/617 नितीन लोखंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनिल जाधव  करत आहेत.

Post a Comment

0 Comments