ब्रेकींग : शरद पवार हे सोलापूरात अन् उत्तरमध्ये राष्ट्रवादीची भाजपशी युती ? उत्तरच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास नोटीस
उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर पंचायत समितीच्या माजी सभापती संध्याराणी पवार, उपसभापती जितेंद्र शीलवंत, सदस्य हरी शिंदे या तिघांनी अविश्वास ठरावाची नोटीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिली आहे. यावेळी विशेष म्हणजे इंद्रजीत पवार, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांची उपस्थिती होती.
उत्तर पंचायत समितीमध्ये संध्याराणी पवार या अडीच वर्षानंतर पुन्हा इच्छुक होत्या मात्र दिलीप माने काका साठे यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलेल्या रजनी भडकुंबे यांना सभापती केले, त्यावेळी भडकुंबे या बिनविरोध सभापती झाल्या होत्या. मागील काही दिवसांपासून बाजार समिती सभापती च्या राजकारणावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठी आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या चांगलेच बिनसले आहे सार्वजनिक कार्यक्रमात ते एकमेकांच्या विरोधात भाषा करू लागले आहेत त्यामुळे काका साठे गटाने भाजपच्या पवार कंपनी सोबत हातमिळवणी करत दिलीप माने यांना टेंशन देण्यासाठी त्यांच्या गटाच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोलापुरात आहेत आणि त्याच दिवशी उत्तर तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तर तालुक्यामध्ये पंचायत समितीचे चार सदस्य आहेत त्यामुळे सभापतींच्या विरोधात तीन सदस्यांनी मतदान केल्यास त्या सभापतीचे पद जाईल, दिलीप माने हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असताना काका साठे यांनी उचललेलं हे पाऊल पक्षासाठी घातक ठरेल का? त्यामुळे आता उत्तर तालुक्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
0 Comments