सांगोला , दि . ८ ऑक्टोबर सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची दुसऱ्यांदा निवड झाली . विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर चेतनसिंह केदार सावंत यांनी ( ११ मते ) शेकाप आनंदा माने गटाचे उम ` दवार नगरसेवक गजानन बनकर ( १० ) यांचा केवळ एका मताने पराभव केला .
सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी ( दि . ८ ) निवडणूक झाली . निवडणूक निर्णय अधिकारीम्हणून नगराध्यक्षा राणीताई माने यांनी काम पाहिले . दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी चेतनसिह केदार सावंत यांची निवड झाल्याने म हाविकास आघाडी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला . चेतनसिंह केदार सावंत यांचा आ . शहाजीबापू पाटील , दीपक साळुंखे - पाटील आदींनी सत्कार केला . यावेळी तानाजी पाटील , डॉ . पियुष साळुंखे - पाटील , सचिन लोखंडे , सतीश सावंत , जुबेर मुजावर , सोमेश यावलकर , नगरसेविका भामाबाई जाधव , स्वाती मस्के , सुनीता खडतरे , शोभा घोंगडे , पूजा पाटील , अनुराधा खडतरे , रंजना बनसोडे , आनंद घोंगडे , अनिल खडतरे , बंडू उर्फ अनिल केदार , संजय केदार आदी उपस्थित होते
0 Comments