google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे महिम येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन संपन्न.

Breaking News

नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे महिम येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन संपन्न.

 नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे महिम येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन संपन्न.


सांगोला/प्रतिनिधी, काल दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महिम येथे सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नीरा उजवा कालव्यातून पाझर तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पाणी पूजन संपन्न झाले. या पाझर तलावात गेल्या तीन वर्षापासून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाझर तलावात सोडलेल्या पाण्याचा फायदा महीम गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे बागायत क्षेत्र वाढत आहे. या पाझर तलावात सोडलेल्या पाण्याचा फायदा उन्हाळ्यात ही होतो. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला दिलेल्या आश्वासना प्रमाणे सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुका ही ओळख आमदार शहाजीबापू पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीतून पुसताना दिसत आहे. 


अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या पाण्याच्या योजना आमदार शहाजीबापू पाटील आमदार झाल्यापासून मार्गी लागल्या असल्यामुळे तालुक्यातील जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे पाणी पूजनाच्या कार्यक्रमासाठी यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब बंडगर, दिगंबर कारंडे, दिलीप मरगर, सोमनाथ मरगर, विजय मरगर, चंद्रशेखर बंडगर, सुरेश महापुरे, हनुमंत कारंडे, विष्णू पाटील, आण्णा पाटील, नागन्नाथ लवटे, यशवंत कारंडे, दत्तात्रय घोगरे, गणपतराव पाटील, राहुल मरगर, बळवंत शिनगारे, सिताराम नारनवर, पप्पू पाटील, श्रीकांत चौगुले, विजय काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments