पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन - रफिकभाई नदाफ.
सांगोला (वार्ताहार) सांगोला तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. रामकृष्ण मंगल कार्यालय वाढेगाव रोड सांगोला येथे आयोजित केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी दिली.
गेली दीड वर्षे कोरोना महामारी मुळे जाहीर कार्यक्रम बंद असल्याने मागील वर्षी आमदार शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना केवळ दोन वर्षांच्या कार्यकाळा मध्ये सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे शहाजीबापूंच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याने तालुक्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी शहाजी बापूंचा वाढदिवस उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सुर्यकांत घाडगे व शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी केले आहे.
0 Comments