ब्रेकींग : सोलापूर नवे पोलीस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती
सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची नियुक्ती झाली.
सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र कराळे यांनी सोलापुरात येण्यास इंटरेस्ट दाखवला नाही.
त्यामुळे अंकुश शिंदे यांना काही दिवस सोलापुरात थांबावे लागले होते दरम्यानच्या काळात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर हा विषय काढला असता त्यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात नव्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईल अशी माहिती दिली त्यानुसार शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर साठी नवे पोलिस आयुक्त म्हणून हरीश बैजल यांची नियुक्ती झाली आहे ते आता केव्हा पदभार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments