google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू ओम गुळमिरे सोलापूर जिल्हा संघात निवड

Breaking News

राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू ओम गुळमिरे सोलापूर जिल्हा संघात निवड

 राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू ओम गुळमिरे सोलापूर जिल्हा संघात निवड


सांगोला/प्रतिनिधी :सांगोला येथील राजमाता क्रिकेट अकॅडमीचा उत्कृष्ट खेळाडू ओम गणेश गुळमिरे याची 16 वर्षाखालील सोलापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. या अगोदर तो 14 वर्षाखालील सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात खेळला आहे.

 सोलापूरचा संघ सामना खेळण्यासाठी दि. २४ ऑक्टोबर रोजी नाशिकला रवाना होत आहे. सोलापूर संघाचे सामने नाशिक, औरंगाबाद व उस्मानाबाद यांच्यासोबत होणार आहेत.

ओम गुळमिरे याच्या निवडीबद्दल त्याला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आनंदा माने, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे अध्यक्ष उदय डोके सर तसेच डॉ.अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच त्याला राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments