मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालाच्या अध्यक्षपदी शरद पवार
, आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणाऱ्या “ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ” अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली . महाराष्ट्र व भारताचे अग्रणी नेते शरद पवार या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहज निवडून आले . त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल . उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते . तीही निवडणूक एकतर्फीच होवून सात दिग्गज उमेदवार निवडून आले . निवडून आलेल्यात , सौ विद्या चव्हाण , माजी , भालचंद्र मुणगेकर , अरविंद सावंत , प्रदीप कर्णिक , प्रभाकर नारकर , कु . अमला नेवाळकर , श्री . शशी प्रभू , हेही विद्वजन निवडून आले .तसेच 15 कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली . अशी माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली .

0 Comments