आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 50 % सवलतीच्या दरात महालक्ष्मी आटा चक्की वाटप.
सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबविले गेले विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, वृक्षरोपण, शालेय साहित्य वाटप, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सांगोला येथे महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार शहाजीबापू पाटील फाउंडेशन च्या वतीने कुटुंबासाठी उपयुक्त असणारी व सहज वापरता येणारी आटाचक्की ५० % सवलतीच्या दरात सांगोला तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नंबर एक चा ब्रँड असणारी महालक्ष्मी आटा चक्की दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असून रेग्युलर मॉडेल१४९९०ऐवजी ६९९०मध्ये व ऑल इन वन मॉडेल२१९९०ऐवजी ९९९० मध्ये उपलब्ध असून दिनांक २४ सप्टेंबर पासून आटाचक्की वाटप चालू झाले असून दिनांक २ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते ०६ वाजेपर्यंत आमदार शहाजीबापू पाटील जनसंपर्क कार्यालय मिरज रोड सांगोला येथे वाटप चालू असणार आहे. लाभार्थ्यांनी आटाचक्की घेण्यासाठी येत असताना सोबत आधार कार्ड लाभार्थी फोटो आणावा असे आमदार शहाजीबापू पाटील फाउंडेशन यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे माहीतीसाठी ०२१८७-२२२९९९, ९८९०९०१३११ ८८०५४४५६५४, ९९७०९०३३९९, या नंबर वरती संपर्क करण्यात यावा.

0 Comments