धक्कादायकः भुसावळात नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार
भुसावळ शहरातील एका भागात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला सख्या बापाकडून गेल्या 3 वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे . याप्रकरणी नराधम बापाला अटक केली असून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , भुसावळ शहरातील एका भागात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपला आई - वडिलांसह राहते . दरम्यान पीडित मुलीला तीचे सख्खे 41 वर्षीय वडीलांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देवून गेल्या तीन वर्षांपासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने केल्याची अत्याचार धक्कादायक घटना उघडकीला आली आहे . याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नराधम बापाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहे .

0 Comments