आज सांगोला शहरात काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन : सुनील भोरे सर :
सांगोला / प्रतिनिधी : डॉ . धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा . प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दि . २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजता कविराज मंगल कार्यालय , महद रोड , सांगोला येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे . तरी सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील भोरे सर यांनी केले आहे . डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जनसंपर्क अभियान राबवले आहे . सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे . या जन स पक अभियानांतर्गत मागील दोन दिवसांपासून महूद , लोटेवाडी , वाकी ( शिवणे ) , चिंचोली , मेडशिंगी , घेरडी , संगेवाडी , चिणके , चोपडी , कोळा , लोणविरे , सोनंद या गावांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर सांगोला तालुक्यातील दौऱ्याची सांगता शहरातील मेळाव्याने होणार आहे . सदर मेळाव्यास सांगोला शहरातील तमाम काँग्रेस प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भोरे यांनी केले आहे .

0 Comments