google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जुजारपूर येथे महिलेचा घरामध्ये अज्ञात कारणाने मृत्यू

Breaking News

जुजारपूर येथे महिलेचा घरामध्ये अज्ञात कारणाने मृत्यू

जुजारपूर येथे महिलेचा घरामध्ये अज्ञात कारणाने मृत्यू


सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील गुणापवाडी रोड जुजारपूर येथे एका महिलेचा घरामध्ये अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याने सांगोला पोलिसात फिर्याद नोंद करण्यात आली आहे . सांगोला तालुक्यातील गुणापवाडी येथील नारायण पाटील यांची पत्नी रूपाली पाटील तिच्या घरातील स्वयंपाक घरामधील फरशीवर उताणी पडली होती .तिच्या अंगावर असलेली साडी अस्ताव्यस्त आली होती . डोळे व तोंड अर्धवट उघडे होते . तिला नागरिकांनी हाक मारल्या नंतर तिची कसलीच हालचाल होत नव्हती . तिने ओ दिली नसल्याने पाहिले नागरिकांनी पाहिले असता गावातील लोकांना तिचा मृत्यू झाल्याचे समजले . गावातील डॉक्टरांनी तपासून पाहिल्यानंतर मयत झाल्याचे सांगितले . त्यानंतर रूपाली पाटील यांची जास्त प्रमाणात मान हलत असल्याचे जाणवत होते . त्यानंतर पोलिसांनी पंचनामा झाल्यानंतर फाड कामासाठी सांगोल्याच्या सरकारी दवाखान्यात पाठवून दिले होते . सरकारी दवाखान्यामध्ये मानेला इजा झाल्याने मरण आल्याचे सांगितले . त्यामुळे सांगोला पोलिसात दादासो दगडू पाटील यांनी या मयताची माहितीची फिर्याद नोंद केली आहे .

Post a Comment

0 Comments