" दुसरा डोस घेणाऱ्यांत कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त " , कारण ...
कोरोना विषाणुची लागण होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. कोरोना संकटाच्या विरोधत लढण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय असून, सरकारकडून लसीकरण मोहीमेवर भर दिली जातीये.त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीमुळे पुणेकरांची वाढू शकतो. कोरोना लसीकरण आणि सद्यस्थितीबद्दल बोलताना अजित पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे.
तज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना लसीकरण झालेल्या लोकांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. सर्वेणानुसार पहिला डोस घेणाऱ्या ०.१९% लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या ०.२५% लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दुसरी लस घेणाऱ्यांचे कोरोना बाधित होण्याचे कारण काय ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वेक्षणाबद्दल माहिती देताना लोक निष्काळजीपणा करत असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार दुसरा डोस घेणारे लोक हे निष्काळजीपणा करतात. त्यामुळे त्यांच्याक कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये सूट देण्यात येत असली तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.


0 Comments