ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे अपहरणकर्ते जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलास यश सांगोल्यातील धक्कदायक प्रकार..
दि . 15/10/2021 रोजी सकाळी 08:00 वा . कोपटेवस्ती सांगोला येथुन सागर शेळके रा . सावे ता . सांगोला यास अज्ञात आरोपीनी जबरदस्तीने पळवून नेलेबाबत पोलीस ठाणे अंमलदार सांगोला याना फोनद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे लागलीच पळवून नेलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे लोकेशन घेतला असता त्यास जवळा घेरडी भागात पळवून नेल्याचे समजले . पोलीस पाटील पेरडी यांच्याकडुन याबाबत माहिती घेतली असता सदर इसमास महाराष्ट्र शासन असे लिहीलेल्या बलेनो गाडीतुन मंगळवेढाकडे घेवुन गेल्याचे समजले . त्यामुळे पोलीस निरीक्षक गुंजवटे मंगळवेढा पोलीस ठाणे याना फोनद्वारे कळविले . पोनि . गुंजवटे यानी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा अतिशय कसोशीने व शीघ्र वापर करुन यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार , मंगळवेढा पोलीस ठाणेच्या हद्दीतील सर्व जनतेस याबाबत कळविले .
त्यामुळे संपूर्ण जिल्हयातील पोलीस यंत्रणा व मंगळवेढा तालुक्यातील जनता सतर्क झाली . त्याप्रमाणे गाडी व अज्ञात इसमांचा शोध घेणेकामी जास्तीतजास्त लोक रस्त्यावर येवुन शोध घेवु लागले . मौजे आलेगाव , वाणी चिंचाळे , लेंडवे चिंचाळे , आंधळगाव , भिकार अकोले , गुंजेगाव येथील सर्व पोलीस पाटील व जनता रोडवर आल्याने पळवून नेलेल्या इसमांच्या त्यांचा शोध होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पळवून नेलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या इसमास संजीवनी हॉस्पीटल मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करुन दवाखान्यातुन वाहनासह पलायन केले . सदर गाडीचा शासकिय वाहनातुन शोध घेत असलेले सांगोला पोलीस ठाणेकडील सहा . पोनि . यमगर , पोना . आप्पासाणे पवार , पोकों , संभाजी भोसले याना सदरची बलेनो गाडी सांगोला नाका मंगळवेढा दिसल्याने त्या गाडीचा पाठलाग सुरु केला . सदर गाडी भिकार अकोल गुंजेगाव रोडने गेली असल्याचे सुरक्षा यंत्रणेच्या कॉलप्रमाणे सतर्क होवुन रोडवर आलेल्या लोकानी माहिती दिली . त्याप्रमाणे गाडीचा पाठलाग केला असता गाडी भिकार अकोले ता . मंगळवेढा येथे मिळुन आली . सदर गाडीचा पाठलाग होत असल्याचे आरोपींच्या लक्षात आलेने ते गाडी सोडुन पळुन गेले . त्यानंतर जखमी सागर शेळके यानी घडल्याप्रकाराबाबत संजीवनी हॉस्पीटल मंगळवेढा येथे उपचार घेत असताना आरोपी आण्णा सदाशिव खांडेकर तसेच सतीश बंदु मोटे दोघे रा . सावे यांच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीप्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला असता आरोपी आण्णा सदाशिव खांडेकर हा मिळुन आलेने त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे . सदरची कामगीरी
मा . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव साधे , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप सांगोला पोलीस ठाणे , पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे मंगळवेढा पोलीस ठाणे , सपोनि . नागेश यमगर , सपोनि . रवि राजुलवार , पोसई गौरीशंकर शिंदे , एएसआय कल्याण ढवणे , पोना . आप्पासाणे पवार , पोना . धनंजय अवताडे , पोना . राहुन कोरे , पोना . राहुल देवकते , पोना . विशाल लेंडवे , पोना . दिपक भोसले , पोकॉ . संभाजी भोसले , चापोकॉ . मोहन भुजबळ , सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ . अन्वर आतार तसेच मंगळवेढा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी कसोशीने पार पाडलेली आहे . सदर गुन्ह्याचा तपास सपोनि बाळासाहेब माने हे करीत आहेत . . मा . जिल्हा पोलीस अधीक्षक सौ . तेजस्वी सातपुते madam यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे . पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपतीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे . ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री . डी . के . गोर्डे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दिले आहे .
गेल्या महिनाभरात सोलापूर जिल्ह्यातील 600 गावे यंत्रणेत सहभागी झालेले असून उर्वरित गावे 31 ऑक्टोबर पर्यन्त सहभागी होणार आहेत . ग्राम सुरक्षा यंत्रणा 18002703600 वापराबाबत जिल्ह्यातील ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की आपापल्या कुटुंबातील सर्व नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवून घेण्यासाठी पोलिस पाटील किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा . परिसरातील नागरिकांना महत्वाची / संकटकालीन माहिती एकाचवेळी देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असणारा कोणताही नागरिक यंत्रणेचा पुढील पद्धतीने वापर करू शकतो . . 1. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर 18002703600 किंवा सर्वसाधारण नंबर 9822112281 मोबाईल मध्ये किंवा मदत या नावाने सेव्ह करून ठेवावा . 2. तातडीची माहिती परिसरातील सर्व नागरिकांना देण्यासाठी
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर 18002703600 किंवा सर्वसाधारण नंबर 9822112281 वर आपल्या नोंदणी केलेल्या नंबरवरून कॉल करावा . 3. मिळणाऱ्या सुचना बारकाईने ऐकून 1 दाबावा . 4. बीप आवाज आल्यानंतर स्वतःचे नाव , गावाचे नाव , सूचना किंवा घटनेचे स्वरूप स्पष्ट व नागरिकांना समजेल आशा भाषेत 25 सेकंदात रेकॉर्ड करावे व कॉल बंद करावा . 5. आपण रेकॉर्ड केलेला संदेश आपल्या गावातील यंत्रणेत सहभागी सर्व नागरिकांच्या मोबाईल वर कॉल स्वरूपात तत्काळ प्रसारित होतो . पोलीस दलाशी संबंधित घटनांचे कॉल स्थानिक पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांनाही प्रसारित होतो . 6. संकट काळात स्थानिक नागरिक व प्रशासनाची तत्काळ मदत मिळते .
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे दुर्घटना टाळण्यात यश येत आहे . 1. बार्शी पोलीस स्टेशन हद्दीतील गूळपोळी गावात रात्री 2 वाजता चोरीची घटना टाळण्यात यश . 2. पांगरी पोलीस स्टेशन हद्दीतील नारी गावातील ज्वेलर्स दुकान फोडण्यापासून वाचवण्यात यश . 3. करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारगाव येथून बेपता झालेला मुलगा तत्काळ शोधण्यात यश . 4. करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील कोळगाव येथील 30 एकर ऊस आगीपासून वाचवण्यात यश . 5. वैराग पोलीस हद्दीतील राळेसर येथे चोरीची घटना टाळण्यात यश . 6. करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील पांगारे गावात एक चोर जेरबंद करण्यात यश .
7. सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील हणमंतगाव येथील हरवलेला मुलगा शोधण्यात यश . 8. मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरे गावात वाहन चोरी रोखण्यात यश . 9. करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील भिलारवाडी येथे चोरीची घटना टाळण्यात यश . 10. सांगोला तसेच मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीतील अपहरणकर्ते जेरबंद करण्यात यश याशिवाय सर्वसाधारण सूचना देण्यासाठी गेल्या एक महिन्यात 2500 पेक्षा जास्त वेळा ग्रामस्थांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर केला आहे . सोलापूर जिल्हा चोरी , दरोडा मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन यंत्रणेचा प्रभावी वापर करावा असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे . चोरी / दरोडयाच्या घटनेत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर कसा करावा यांचे नाट्य रूपांतर_ http://gramsu.com/Robbery.mp3 आग / जाळिताच्या च्या घटनेत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर कसा करावा यांचे नाट्य रूपांतर_ http://gramsu.com/audio/Firecase.mp3 ग्राम सुरक्षा यंत्रणा माहिती पुस्तक_ http://gramsu.com/app/GSY INFO.pdf

0 Comments