google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेसला ' जनसेवा'चा बूस्ट ! जिल्हाध्यक्ष डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांच्यामुळे उर्जितावस्था

Breaking News

काँग्रेसला ' जनसेवा'चा बूस्ट ! जिल्हाध्यक्ष डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांच्यामुळे उर्जितावस्था

काँग्रेसला ' जनसेवा'चा बूस्ट ! जिल्हाध्यक्ष डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांच्यामुळे उर्जितावस्था


 मंगळवेढा , ता . १५ सोलापूर लोकसभेच्या सलग दोन पराभवानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवेढ्याकडे असलेले लक्ष कमी केल्यामुळे काँग्रेसला तालुक्यात मरगळ आली होती . मात्र स्व . प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या राजकीय वाटचालीमध्ये जनसेवा संघटनेच्या माध्यमातून योगदान दिलेल्या मंगळयातील जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ . धवलसिंह मोहिते पाटील यांनी कोमात गेलेल्या काँग्रेस पक्षाला तालुक्यात आणलेली उर्जितावस्था पक्षासाठी आगामी काळासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे . सोलापूर लोकसभेच्या सलग दोन पराभवानंतर सुशीलकुमार शिंद यांनी मंगळवेढ्याकडे असलेले लक्ष कमी केल्यामुळे तालुक्यात कांग्रेसला मरगळ आली होती . अशातच डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांनी पदभार जिल्हाध्यक्षचा घेतल्यानंतर सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मंगळवेढ्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला . मोहिते - पाटील जिल्ह्यात घराण्याचा अनेकांशी राजकीय संबंध आला आहे . पदभारानंतर नुकताच डॉ . धवलसिंह मोहिते - पाटील यांनी मंगळवेढा दौरा केला . या दौऱ्यामध्ये त्यांनी स्व . प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या बरोबरीने काम केलेले स्व . भालकेंचे समर्थक उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , दादा टाकणे , मारुती वाकडे , भीमराव मोरे , पांडुरंग जावळे , विश्वनाथ शिंदे , प्रशांत साळे , भीमराव कांबळे , राजू पाटील , आप्पासाहेब माने या सहकान्यांशी चर्चा केली . तसेच अँड . नंदकुमार पवार , संदीप फडतरे , दिलीप जाधव , राजाराम सूर्यवंशी , मुरलीधर घुले , नाथा ऐवळे , राजाभाऊ चेळेकर , फिरोज मुलाणी यांच्या बरोबरीने काँग्रेसची विस्कटलेली मोट बांधण्यात यश मिळवले . विवट्याची शिकार करून चर्चेत आलेले डॉ . भक्लसिंह मोहिते - पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची शिकार करणार का , याची देखील चर्चा यानिमित्त होऊ लागली आहे . सध्या भालके गटातील अनेकांनी काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवलेली आहे . शहरात १७ पैकी सात नगरसेवक काँग्रेसचे आहेत . पक्षीय बलाबलात आघाडीवर असल्यामुळे या जागा पुढे टिकवणे हे काँग्रेससाठी आव्हान असले तरी , त्या दृष्टीने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जुळणी सुरू केली आहे . त्यामध्ये सध्या राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या दोन गटांतील कोण हाताला लागते का , याची देखील चाचपणी चालू केली . त्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला धवलसिंह यांनी ऊर्जितावस्था आणून दिली आहे . त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता वेगाने हालचाली करू लागले . पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य आहेत . आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जीवनात योगदान देणाऱ्यांना संधी देण्याचे संकेत मोहिते - पाटील यांनी दिले आहेत . ग्रामीण भागातील पक्षाची धुरा नव्या कार्यकर्त्यांवर सोपवली जाणार असल्यामुळे या पक्षाला भविष्यात अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Post a Comment

0 Comments