शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती नकोच ! अन्यथा अवमाननेची कारवाई : हायकोर्टाने बजावले
राज्यातील शासकीय कार्यालयांत आवश्यकता नसताना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती नकोच , असे बजावत हायकोर्टाने अधिसूचनेचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध अवमाननेची कारवाई करण्याचे आदेश दिले . यासंबंधी प्रत्येक कार्यालयाची कार्यशाळा घेऊन त्यांना माहिती दिली जावी , असेही न्या . " " एस . व्ही . गंगापूरवाला आणि न्या . आर . एन . लड्डा यांच्या खंडपीठाने सुनावणीत स्पष्ट करत याचिका निकाली काढली . आतापर्यंत शंभर रुपये किमतीचे ३ ९ कोटी ६ लाख ७८ हजार स्टॅम्प पेपर कारण नसताना राज्यभर वापरण्यात आल्याचे आढळून आले . याचिकाकर्ते भूषण ईश्वर महाजन हे एलएलबीचे विद्यार्थी आहेत .
महाजन यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवून त्याची तक्रार त्यांनी महसूल मंत्रालयात केली . परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही . त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपर बंधनकारक करण्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अॅड . सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती . अॅड . प्रज्ञा तळेकर , अॅड . उमाकांत आवटे व अॅड . अजिंक्य काळे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली , तर सहाय्यक सरकारी वकील अतुल काळे यांनी काम पाहिले . याचिकेत राज्य शासनाचे प्रधान सचिव , अप्पर मुद्रांक नियंत्रक , मुंबई , नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांना प्रतिवादी केले होते . काय आहे अधिसूचना ? राज्य शासनाने १ जुलै २००४ रोजी राजपत्र प्रकाशित करून शासकीय कार्यालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रांसाठी शंभर रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे .
त्यामुळे २००४ पासून शासकीय कार्यालयात सादर करायचे कोणतेही प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर करता येते . याबाबत शासनाने गेल्या १७ वर्षांत वेळोवेळी शासकीय परिपत्रके काढली . विशेष म्हणजे राज्यभर | शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आल्याने २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती . त्यात मुंबईच्या अप्पर मुद्रांक नियंत्रकांनी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर आवश्यक नसल्याचे कबूल केले होते व त्यानंतर तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिज्ञापत्र हे कोऱ्या कागदावर सादर केले तरी चालेल , असा खुलासाही केला होता . परंतु आजही राज्यभर पीक कर्ज , शेती , वीज जोडणी , जात प्रमाणपत्र आदी कोणत्याही कारणासाठी प्रतिज्ञापत्र करताना शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती केली जाते . सर्वच मुद्रांक विक्रेतेही १०० रुपयांचा स्टॅम्प खरेदी करण्याची सक्ती " करतातच .

0 Comments