google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिव्यांगांना मिरची कांडप तर इतरांना कडबाकुट्टी मिळणार समाजकल्याणची योजना दलितवस्ती विकास योजनेसाठी १६ कोटी

Breaking News

दिव्यांगांना मिरची कांडप तर इतरांना कडबाकुट्टी मिळणार समाजकल्याणची योजना दलितवस्ती विकास योजनेसाठी १६ कोटी

 दिव्यांगांना मिरची कांडप तर इतरांना कडबाकुट्टी मिळणार समाजकल्याणची योजना दलितवस्ती विकास योजनेसाठी १६ कोटी


सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजकल्याण विभागातर्फे मिरची कांडप , झेरॉक्स मशीन , वीजपंप , कडबाकुट्टी व शेळीगटाचे वाटप सुरू आहे . मागासवर्गीय व दिव्यांग असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे . जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात . यात सेस फंडातील योजनाही आहेत . कोरोना महामारीमुळे सेस फंडाला ४० टक्के कात्री लावण्यात आली आहे . तरीही दिव्यांगांसाठी पाच टक्के याप्रमाणे १ कोटी २० लाख तर इतर मागासवर्गीयांसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी देण्यात आला आहे . याशिवाय दलितवस्ती विकास योजनेला शासनाकडून १६ कोटी ५० लाखांचा निधी आला आहे . गटार , ग्रामपंचायतींना पाणीटाकी , हायमास्ट अशा सुविधा उभारण्यासाठी हा निधी देण्यात येणार रस्ते , पाणी टाकी, हायमास्ट अशा सुविधा उभारण्यासाठी हा निधी देण्यात येणार.


समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जाते . यासाठी केंद्र व राज्य शासन निधी देते , मागील वर्षी केंद्र शासनाचे २५ लाख आले , पण राज्य शासनाचा हिस्सा न आल्याने अनुदान वाटप केलेले नाही . अनुसूचित जाती , व्हीजेएनटीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते . व्हीजेएनटीमधील विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती वाटपासाठी अनुदान आलेले नाही . पाच तालुक्यांतील पात्र लाभाथ्र्यांची यादी सादर केली आहे .डीबीटी योजना असल्याने लाभाथ्र्यांना आधी साहित्य खरेदी करावे लागते . 


त्यानंतर समाजकल्याण विभागाकडे पावती सादर केल्यावर अनुदान थेट बँक खात्यावर जमा केले जाते . झेरॉक्स मशीन , वीजपंप , मिरची कांडप , शेळीगट स्वरेदीसाठी एवढी रक्कम गरिबांकडे असणे अशक्य असते . शिवाय उसनवारी करून खरेदी केल्यावर पैसे केव्हा खात्यावर जमा होतील याची शाश्वती नसते .समाजकल्याण विभागामार्फत डीबीटी योजना शिष्यवृत्ती दलितवस्ती सुधारणा योजना राबविल्या जातात . त्याचबरोबर जिल्ह्यात १५७ वसतिगृहे आहेत . कोरोनामुळे वसतिगृहे बंद असल्याने फक्त कर्मचाऱ्यांचे मानधन काढले ' जाते . परिपोषण योजना बंद आहे . पंढरपूर येथे एक वृद्धाश्रम आहे . त्याचेही २० लाख अनुदान थकले आहे . दलितवस्ती कामे व डीबीटी योजनेची कामे सुरु आहेत .

Post a Comment

0 Comments