उद्योगपती श्री. सुरेश (काका) चौगुले यांची नाझरे येथील नालंदा बुद्ध विहारास सदिच्छा भेट
मौजे:- नाझरे येथे पौर्णिमेचे औचित्य साधून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. सुरेश (काका) चौगुले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा आदरसत्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री. सुरेश चौगुले यांनी मंडळाच्या या कार्याचे व सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. व बौद्ध विहारास आपणाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री. सुहास गडहिरे, अमर ढोबळे, मनोज ढोबळे ,विराज ढोबळे, विजय ढोबळे, गणेश रोकडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments