google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी सांगोला..

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी सांगोला..

 विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी सांगोला..


सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे महात्मा गांधी यांची 152 वी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण भाऊ केदार आणि वासुद ग्रामपंचायत सदस्य भारत केदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. अविनाश लोखंडे, दत्तात्रय भजनावळे, श्रीम. विमल माने आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. अशोक वाकडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments