डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन
सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त जिमखाना विभाग, विज्ञान महाविद्यालय, सांगोला यांच्या वतीने सांगोला शहरात प्रथमच भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन रविवार 03 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ठीक 6 वाजता विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा सांगोला – खर्डी – सांगोला दरम्यान पार पडणार असून स्पर्धेमधील प्रथम 7 विजयी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच जे स्पर्धक सहभागी होवून स्पर्धा पूर्ण करणार आहेत त्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सांगोला तालुक्यात अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच आयोजित केल्या गेल्या असून सर्व सायकल प्रेमींनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रा. विजय पवार 9322065021 यांना संपर्क करावा, असे जिमखाना विभाग, विज्ञान महाविद्यालय, सांगोला यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


0 Comments