google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दीड लाख देऊन नवरी घरी आणली; मात्र तिने नवऱ्याला दिवसा काजवे दाखवले. घटना सांगोला तालुक्‍यात घडली आहे.

Breaking News

दीड लाख देऊन नवरी घरी आणली; मात्र तिने नवऱ्याला दिवसा काजवे दाखवले. घटना सांगोला तालुक्‍यात घडली आहे.

 दीड लाख देऊन नवरी घरी आणली; मात्र तिने नवऱ्याला दिवसा काजवे दाखवले.घटना  सांगोला तालुक्‍यात घडली आहे.

लग्नाळू तरुणांना आजकाल लग्न जमवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. प्रसंगी मध्यस्थींना लाखो रुपये देऊन नवरी मिळवावी लागत आहे. मात्र नव्या नवरीनेच...सांगोला (सोलापूर) : लग्नाळू तरुणांना आजकाल लग्न (Marriage) जमवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. प्रसंगी मध्यस्थींना लाखो रुपये देऊन नवरी मिळवावी लागत आहे. मात्र नव्या नवरीनेच नवऱ्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकावल्याची घटना सांगोला तालुक्‍यात घडली आहे. 


सांगोला येथील तरुणाने लग्न लावण्याकरिता मध्यस्थास एक लाख 65 हजार रुपये दिले. लग्नही झाले. परंतु, लग्नानंतर आठ दिवसात नवी नवरी घरातील कपाटातील अडीच लाख रुपये घेऊन धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भावी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या नवऱ्याला धक्काच बसला. मात्र, या धक्‍क्‍यातून सावरत नवऱ्याने शक्कल लढवून मध्यस्थास दुसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवले अन्‌ मध्यस्थी आयताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. घटना सांगोला तालुक्‍यात घडली. याबाबतची फिर्याद फसवणूक झालेला नवरदेव गोपाळ देविदास साळुंखे (रा. बामणी, ता. सांगोला) यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी गोपाळ देविदास साळुंखे हे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून शेती करतात. 


त्यांनी विवाह जमवण्यासाठी मध्यस्थास 1 लाख 65 हजार रुपये देऊन उषा बालाजी हांडे (रा. अहमदपूर, जि. लातूर) हिच्याशी 19 सप्टेंबर रोजी विवाह केला. विवाहाच्या अगोदरच मध्यस्थीने एक लाख 65 हजार रुपये घेऊन आठ दिवसांनंतर सर्व कागदपत्रे घेऊन कोर्टात लग्न करण्याकरिता येतो, असे सांगून नवरी मुलीकडील आलेले आठ ते दहा लोक तत्काळ निघून गेले. विवाहानंतर 27 सप्टेंबर रोजी नवरदेवाच्या घरातील सर्वजण डाळिंब तोडण्यासाठी शेतात गेले. यावेळी पाऊस आला. पाऊस आल्यानंतर नवी नवरी, पायातील जोडवी पडल्याचा बहाणा करत शेतात निघून गेली; परंतु ती परत आलीच नाही. यावेळी शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. इकडे घरातील ट्रान्सपोर्टसाठी ठेवलेले अडीच लाख रुपयेही सापडले नाहीत. हा सर्व घटनाक्रम पाहता आपली नव्या नवरीकडून व मध्यस्थाकडून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या धक्‍क्‍यातून सावरत नवरदेवाने शक्कल लढवून दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीकडून मध्यस्थीला फोन केला व दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवले. 28 सप्टेंबर रोजी लग्न लावून दिलेल्या मध्यस्थ गंगाबाई हनुमंत वाघमारे हिला मित्राचे लग्न लावायचे असल्याबाबत सांगून तिच्याकडे बायोडाटा पाठवून दिला. त्या वेळी गंगाबाई वाघमारे हिने, मी मुलगी घेऊन येते, तुम्ही एक लाख 65 हजार रुपये तयार ठेवा, असे सांगितले. 


30 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मांजरी (ता. सांगोला) येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे मध्यस्थ आले. यावेळी पहिल्या लग्नाविषयी विचारले असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु फिर्यादी नवरदेवाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवल्यानंतर मध्यस्थ गंगाबाई वाघमारे ही "तुमचे पैसे मी परत देते, तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करू नका' अशी विनवणी करू लागली. परंतु मध्यस्थीने पैसे माघारी न दिल्याने फिर्यादी नवरदेवाने गंगाबाई हनुमंत वाघमारे, श्रावण हनुमंत वाघमारे (दोघे रा. उंदरी, ता. मुखेड, जि. नांदेड), उषा बालाजी हांडे (रा. अहमदपूर, जि. लातूर), तुकाराम आगलावे पाटील, सुमन आगलावे पाटील (रा. घन्सी तांडा, उदगीर, जि. लातूर) या पाच जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली. यातील दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments