राऊत मळा येथील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश युवा नेते चैतन्य ( दादा ) राऊत मित्र परिवाराचा जाहीर शिवसेनेत प्रवेश
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला येथील राऊत मळा या ठिकाणचे शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे . आमदार शहाजीबापू पाटील यांनी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले व नारळ वाढवून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम केला . यावेळी ते बोलताना म्हणाले की , राऊत मळा हा शेकापचा बालेकिल्ला असला तरी मला २०१ ९ च्या निवडणुकीत या लोकांनी मतदानाच्या स्वरूपात सहकार्य केले आहे .यापुढे राऊत मळ्यातीले प्रलंबित प्रश्न असतील ते आमदार फंडाच्या माध्यमातून तात्काळ मार्गी लावून दिले जातील . शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो.या कार्यकत्यांच्या पाठीशी सदैवपने खंबीरपणे उभा राहणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.येत्या तीन वर्षात सांगोला शहराचा विकास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले . शिवसेनेचे पद प्रमुख व महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहरात अनेक विकास कामांचा सपाटा लावला आहे . सांगोले शहराच्या संदर्भात जितके शक्य होईल तितके काम आपण या ठिकाणी करणार आहोत . यावेळी युवानेते अच्युत फुले प्रस्तावनेत | म्हणाले की , राऊत मळ्यातील जे | रस्त्यांचे , डीपीचे जे काही प्रश्न होते .
ते आमदार शहाजीबापूच्या माध्यमातून पूर्ण करू असे सांगितले . या वेळी शिवसेना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर म्हणाले की , सांगोला शहर व तालुक्यात आमदार बापूंच्या बुलेट ट्रेन सारख्या विकास कामांना गती आली आहे . तसेच कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो . यावेळी कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ , शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब माझी नगरसेवक अरुण बिले , रमेश फुले , समीर पाटील , गुंडा खटकाळे , सागर चव्हाण , रफिक तांबोळी , प्रसाद फुले , अभिषेक फुले , चैतन्य पाटील , अजिंक्य घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद घोंगडे यांनी केले . पक्ष प्रवेश यामध्ये मारुती राऊत , दशरथ राऊत , भारत जाधव , ज्ञानू राऊत , अमित राऊत , रमेश फुले , भाऊसाहेब नवले , विक्रम राऊत , अजित फुले , बाळासाहेब नवले , दत्तात्रय नवले , सोमनाथ म्हसवडे , अक्षय राऊत , प्रवीण फुले , सचिन राऊत , सिद्धनाथ नवले , आदी कार्यकत्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे .


0 Comments