शिवणे विद्यालयात ई - पीक पहाणी कार्यशाळा संपन्न
शिवणे / सुधीर कोले शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार | दि . २५ सप्टेंबर रोजी ११.०० वाजता ई पीक पाहणी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या फोटोचे पूजन करण्यात आले . प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर सोनलवाडी एकतपुर चे | तलाठी हरिचंद्र जाधव यांनी ई - पीक पाहणी प विषयक माहिती देऊन प्रत्यक्ष प डाउनलोड करण्यास मदत केली . तसेच पीक पाहणी भरण्याची माहिती देऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले . व येणाऱ्या अडचणी सोडवल्या तसेच
विद्यार्थिनी शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले . यावेळी शिवणे विभागाचे मंडलअधिकारी एस . आर . कोळी साहेब यांनी पच्या माध्यमातून पिकांची माहिती नोंदवल्यास होणारे फायदे सांगून
यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले . तर अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी पुरातन काळापासून पाहणीची काय अवस्था होती त्यामुळे शेतकन्यांचे कसे नुकसान होत होते या विषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांनी है नवीन तंत्र आत्मसात करत्न आपली व आपल्या शेजारच्या शेतकन्यांना ई पीक पाहणीची माहिती भरण्यास मदत करावी असे आवाहन केले . हा सर्व कार्यक्रम कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात आला . यावेळी नामदेव अंदर अचकदाणी चे तलाठी नामदेव अलदर सर्व शिक्षक व या कार्यक्रमासाठी बोलावलेले निवडक विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ कोळवले यांनी केले तर प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी आभार मानले .


0 Comments