google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पक्षाचा दि.3 ऑक्टोबर रोजी 64 वा वर्धापन दिन सोहळा उल्हासनगरमध्ये साजरा होणार नगरसेवक श्री. सुरजदादा बनसोडे

Breaking News

रिपब्लिकन पक्षाचा दि.3 ऑक्टोबर रोजी 64 वा वर्धापन दिन सोहळा उल्हासनगरमध्ये साजरा होणार नगरसेवक श्री. सुरजदादा बनसोडे

रिपब्लिकन पक्षाचा दि.3 ऑक्टोबर रोजी  64 वा वर्धापन दिन सोहळा  उल्हासनगरमध्ये साजरा होणार

नगरसेवक श्री. सुरजदादा बनसोडे


मुंबई दि. 30 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या   संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 64 वा वर्धापन दिन सोहळा येत्या दि. 3 ऑक्टोबर  रोजी दुपारी 3 वाजता उल्हासनगर मधील रिजन्सी अंटालिया हाऊस क्लब येथे  आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे. 

 

रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी 3 ऑक्टोबर ला ना.रामदास आठवले  यांच्या नेतृत्वात देशभर साजरा करण्यात येतो.यंदा रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्याचा मान रिपब्लिकन पक्षातर्फे उल्हासनगरला देण्यात आला असल्याची माहिती रिपाइंचे उल्हासनगर अध्यक्ष आणि उल्हासनगर चे उपमहापौर भगवान भालेराव यांनी माहिती दिली आहे. 


 रिपब्लिकन पक्षाच्या 64 व्या वर्धापनदिन सोहळा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत साजरा होणार असून या कार्यक्रमास  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; केंद्रियराज्यमंत्री कपिल पाटील; आमदार कुमार आयलानी; माजी मंत्री रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांना रिपाइं च्या वर्धापन दिन सोहळ्यास निमंत्रित करण्यात आल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे. रिपाइं च्या वर्धापन दिन सोहळ्यास राज्य भरातील रिपाइं चे प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments