नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी महाविकास आघाडीची बैठक
(सांगोला प्रतिनिधी),सांगोला नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी बाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस (आय) सांगोला तालुका महाविकासआघाडीच्या तिन ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उद्या शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता हर्षदा लॉन्स सांगोला येथे आयोजित केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व महाविकास आघाडीचे निमंत्रक रफिक भाई नदाफ यांनी दिली.
सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा.पी.सी.झपके सर व शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांच्यासह ॲड. उदय घोंगडे, बाबुराव गायकवाड, डॉ.पियुष साळुंखे, विलास पाटील व काशिनाथ ढोले आदी मान्यवर उपस्थित राहणार असून येणाऱ्या
नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस (आय) पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत या बैठकीला तिन ही पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, कॉंग्रेसचे (आय) शहराध्यक्ष तोहीद मुल्ला यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती रफीकभाई नदाफ यांनी दिली




0 Comments