शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीने सांगोले तालुक्यातील शेकापक्षात ऊस्ताहाचे वातावरण
दि २५ व २६ सप्टेंबर रोजी सांगोले येथे मध्यवर्ती समीतीची बैठक दोनदिवस पार पडली सदर बैठकीस आ जयंत पाटील,व्हि एस जाधव,धैर्यशिल पाटील,राजेंद्र कोरडे यांच्या सहित राज्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या आनेक नेते व कार्यकरत्यांनी हजेरी लावली.
भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने शेकापक्षातील युवा कार्यकरत्यांमध्ये जोष निर्माण झाला.स्व आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर ही पहीलीच बैठक त्यामुळे सर्व जूने-जाणते,जेष्ठ नेते सुध्दा पुंन्हा जोषात आले.
ही बैठक पार पाडण्यास तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधीकारी कार्यकर्ते हे नियोजन बध्द रीतीने काम करीत होते.दुसर्यादिवशीच्या आ भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने तर सगळे जण जोषात आले त्यातच श्रीमती आक्कासाहेब यांची स्टेज वरील उपस्थीती त्यामुळे तर पक्षातील कार्यकरत्यांना स्फुरण चढले....आगदी सगळे व्यवस्थीत..
त्यानंतर दोनच दिवसानी सांगोले शहरामध्ये राजकीय घडामोडीलाही लगेचच वेग आला व शेतकरी कामगार पक्ष व आनंदा माने गट एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला..आणि शहरातील लोकांच्या ईच्छे प्रमाणे ,मनाप्रमाणे एकत्रीत आलेची चर्चा शहरामध्ये सुरु झाली.एवढे शेकापक्षाचे नेते कार्यकर्ते मनापासुन कामाला लागलेत.विशेषता शेकापक्ष हा केडर पार्टि आसुन एकत्रीत येऊन लोकांची मते जाणुन त्या प्रमाणे सामुदाईक निर्णय घेऊन काम करण्याची शेकापक्षाची पध्दत आहे हे पुंन्हा सिध्द झाले.
शेकापक्षाचे नेते भाई चंद्रकांत (दादा) देशमुख व युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख तसेच युवा नेते डाँ आनिकेत देशमुख हे तालुक्यातील व शहरातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन काहींचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्याशी विचारविनीमय करुन येणार्या निवडणुकाबाबत रणनीती आखत आहेत-चर्चा करीत आहेत.कारण विकासाच्या प्रश्नासाठी निवडणुका लढवायच्या आहेत त्यामुळे लोकांचे सहकार्य प्रतीसाद मीळत आहे. शेकापक्षाचे सर्व नेते व सर्व कार्यकर्ते हे स्व आबासाहेबांचे विचार तळागाळात. पोहचवण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करीत आहेत.आपली ही धडपड सर्वसामांन्याच्या,शेतकर्यांच्या ,कष्ठकर्यांच्या व लहान मोठ्या व्यवसायीकांच्या प्रश्नांनाची सोडवणुक करण्यासाठी आहे ईतरासारखे फक्त निवडणुकी पुरते नाही. हे सर्वांना माहीत आहे.त्यामुळे लोक शेकापक्षावरती विश्वास ठेवत आहेत त्या विश्वासामुळे तालुक्यात व शहरात ऊस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे


0 Comments