google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रविवार 10 रोजी सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन तर 15 ऑक्टोबर पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील

Breaking News

रविवार 10 रोजी सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन तर 15 ऑक्टोबर पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील

 रविवार 10 रोजी सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन तर 15 ऑक्टोबर पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार : मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील 


सांगोला सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन समारंभ संपन्न

सांगोला : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या व नुकताच चालविण्यास भाडेतत्त्वावर डी.व्ही.पी. समूहाकडे हस्तांतरित केलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याचा लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवार 7 रोजी कारखान्याचा मिल रोलर पूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व डी.व्ही.पी. ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन  रविवार 10 रोजी तर कारखाना पूर्णक्षमतेने 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती यावेळी दिपकआबा व अभिजित पाटील यांनी दिली.


सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याच्या लाभ क्षेत्रात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने लांबून ऊस वाहतूक परवडत नसल्याने कारखाना गेली काही वर्षांपासून बंद अवस्थेत होता अखेर हा साखर कारखाना डी व्ही पी ग्रुप कडे चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला यानंतर अवघ्या काही दिवसांतच किरकोळ डागडुजीची कामे पूर्ण करून हा कारखाना सुरु होण्यास आता सज्ज झाला आहे सांगोला सहकारी साखर कारखाना सुरू होत असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्यात काम करत असलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील सर्व सिंचन योजना पूर्णत्वास येत आहेत. त्याचबरोबर निसर्गाचीही या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांना साथ मिळत आहे, यामुळे तालुक्यात ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यात पिकणारा ऊस कारखाना बंद असल्याने नाईलाजाने शेजारील साखर कारखान्यांना त्यांच्या मागे लागून देण्याची वेळ सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर येत होती. परंतु तालुक्यातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारखान्याचे चेअरमन दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली गतिशील केल्या व कारखाना सुरू करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला.


कारखाना भाडेतत्त्वावर डी. व्ही. पी. ग्रुप कडे हस्तांतरित केल्यानंतर कागदोपत्री बाबींची पूर्तता करून तातडीने किरकोळ डागडुजी व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर गुरुवार 7 ऑक्टोबर रोजी मिल रोलर पूजनाचा समारंभ संपन्न झाला. त्यावेळी चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, डी. व्ही. पी. ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, राष्ट्रवादीचे सांगोला शहर अध्यक्ष तानाजीकाका पाटील, डी.व्ही.पी. ग्रुपचे संचालक संतोष कांबळे, रणजित देशमुख, सावंत तात्या तसेच कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव यांच्यासह कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

1) कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास सर्वोतोपरी सहकार्य करणार

चालू गळीत हंगामात पासून सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे. यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे. इथून पुढे कायम हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू राहील, त्यासाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच तालुक्यातील शेतकरी कारखाना प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करतील. 

मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील 

चेअरमन,सां.ता.सह.साखर कारखाना

2) कारखाना सुस्थितीत असल्याने लवकर सुरुवात शक्य

गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे कारखान्याची सर्व मशिनरी तसेच इतर बाबी सुस्थितीत असल्याने दुरुस्ती व डागडुजीसाठी जास्त वेळ गेला नाही कारखाना सुस्थितीत असल्यामुळे लवकरात लवकर डी.व्ही.पी. ग्रुपचा हा चौथा साखर कारखाना आपण पूर्णक्षमतेने सुरू करत आहोत

 अभिजीत पाटील ; प्रमुख, डी.व्ही.पी. उद्योग समूह

Post a Comment

0 Comments