आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) : सेवासदन लाईफ-लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व आमदार अॅड. शहाजीबापू पाटील युवा मंच सांगोला तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर शुक्रवार दि. ०८/१०/२०२१ रोजी स. १०.०० ते दु. ०२.०० या वेळेत सोनंद हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज सोनंद, सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरात हृदय विकार, मेंदू विकार, बायपास शस्त्रक्रिया, मधुमेह, नेत्ररोगत्र, अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, बायपास, फिट, मोतिबिंदू, पॅरेलिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायुंचे आजार, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, अॅपेंडिक्स, पोटांच्या व इतर शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडू तपासणी, गरज पडल्यास ई. सी. जी. / इको/टी.एम.टी मोफत, गरज पडल्यास अॅन्जिओग्राफी सवलतीच्या दरात करण्यात येईल.
महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत उपचार, हॉस्पिटलमध्ये यावे लागल्यास तपासण्यांमध्ये ५० टक्के सवलत,
केस पेपरमध्ये ५० टक्के सवलत,
अॅडमिशन व प्रॉसिजर्स वर २५ टक्के सवलत
डोळयाचे मोतिबिंदु ऑपरेशन मोफत करून लेन्स बसवून मिळतील, शस्त्रक्रियेसाठी सोनंद ते मिरज व मिरज ते सोनंद पेशंटचा प्रवास मोफत असेल, शस्त्रक्रिया होणाऱ्या पेशंटना जेवन व नाष्टा मोफत दिला जाईल. डोळयाचे ऑपरेशन करण्यापूर्वी रक्त-लघवी तपासणी व ड्रॉप यासाठीचे फक्त ५०० रू द्यावे लागतील.
0 Comments