सोलापुरातील बेशिस्त वाहनधारकांवर राहणार'बॉडी कोर्न ' कॅमेऱ्याची नजर
वाहनधारकांनो, आता थोडे सावध राहा! कारण तुम्ही एखाद्या तक्रारीवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांशी वाद घालत असाल, तर त्याचे चित्रीकरण होण्याची शक्यता आहे. शहर वाहतूक पोलीस प्रशासनाने आता वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांच्या शर्टवर 'बॉडी कोर्न' कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर वाहनचालकांचे अनेकदा वाद होतात. वाहनचालक अनेकदा हुज्जत घालत असतात. अनेकांची तर पोलिसांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल जाते. अशा सगळ्या घटना आता कॅमेऱयामध्ये बंदिस्त होणार आहेत. रेकॉर्डिंग होत असताना व्हायब्रेशन सिग्नल असणार आहे. आता दोन्ही प्रकारच्या या कॅमेऱयांत ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंगची सोय असणार आहे.
हा कॅमेरा सीसीटीव्हीसारखा काम करणारा असून, तो मूव्हेबल असणार आहे. चेक पॉइंट व वाहतूक नियंत्रणासाठी तो वापरला जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱयांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत सोलापूर वाहतूक शाखेस हे कॅमेरे मिळणार असल्याचेदेखील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. 'बॉडी कोर्न' कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या शर्टवर खिशाला किंवा खांद्याच्या बाजूला लावला जाणार आहे. याचे वजन 85 ग्रॅम असणार असून, तो वॉटरप्रूफ आहे. कॅमेऱयामध्ये ऑडिओ व एचडी कॅमेरा असल्याने व्हिडीओ स्पष्टपणे दिसणार असून, हा कॅमेरा वापरणाऱया पोलीस कर्मचाऱयांशी नियंत्रण कक्षातूनदेखील संवाद ठेवता येणार आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांशी वाद घालण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. यामध्ये नेमका दोष कोणाचा? हे आता समजणे शक्य झाले आहे. येत्या आठ दिवसांत वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांना 'बॉडी कोर्न' कॅमेरा दिला जाणार आहे.
- दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त, शहर वाहतूक शाखा, सोलापूर.
0 Comments