यशराजे साळुंखे-पाटील यांच्या सूचनेनंतर शिवणे येथील "त्या" रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात
सांगोला /गेल्या अनेक वर्षांपासून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या व दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिवणे येथील मुख्य चौकात भयान अवस्था झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीस यशराजे साळुंखे पाटील यांच्या सूचनेनंतर सुरुवात झाली आहे.
महूद-सांगोला रस्त्यावरील शिवणे ता. सांगोला येथील मुख्य चौकात वाहनांच्या सतत ये-जा करण्याने व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रस्ता पूर्णतः उध्वस्त झाला होता. शिवने येथील दादा घाडगे व आप्पासाहेब जानकर यांनी सदर रस्त्याच्या दुरवस्थेकडे युवक नेते यशराजे साळुंखे-पाटील यांचे लक्ष वेधून सदरच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्याची विनंती केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क करून सदर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी सदरच्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याने शिवने परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
शिवणे येथील मुख्य चौकातच रस्त्याच्या मध्यभागी जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या परिसरात सातत्याने किरकोळ अपघात होत होते. नुकतेच या खड्ड्यात एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. दररोज अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या खड्ड्याची जणू या परिसरातील नागरिकांनी धास्तीच घेतली होती. आपल्या खाजगी कामानिमित्त महूदहुन सांगोला कडे येताना गावात उपस्थित असणाऱ्या दादा घाडगे व आप्पासाहेब जानकर यांनी यशराजे साळुंखे-पाटील यांना कडून रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले. व तात्काळ सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्याची विनंती केली. यावर जराही विलंब न करता घटनास्थळावरून यशराजे साळुंखे-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरच्या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी विनंती केली होती. यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी पासून रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकातून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. व युवा नेते यशराजेंच्या कार्यतत्परतेचेही परिसरातून कौतुक होत आहे.
0 Comments