google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिसांनी 2 अवैध गुटक्याच्या वाहनासह 38 लाख 38 हजाराचा मुद्देमाल केला जप्त : पो.नि.जगताप

Breaking News

सांगोला पोलिसांनी 2 अवैध गुटक्याच्या वाहनासह 38 लाख 38 हजाराचा मुद्देमाल केला जप्त : पो.नि.जगताप

 सांगोला पोलिसांनी 2 अवैध गुटक्याच्या वाहनासह 38 लाख 38 हजाराचा मुद्देमाल केला जप्त : पो.नि.जगताप

दि . १ ९ / ० ९ / २०२१ रोजी रात्री ० ९ : ०० वा एमएच १२ एलटी ४३२८ या महींद्रा पिकअपमधुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतुक होणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोनि . सुहास जगताप सांगोला पोलीस ठाणे यानी सपोनि . नागेश यमगर , सहा.पोनि . आर . जी . राजुलकर , पोना . मेटकरी , पोना , बाबासाहेब पाटील , चा . पो . कॉ . संभाजी काशीद याना मार्गदर्शन करुन वाहन पकडणेकरीता रवाना केले . त्याप्रमाणे सदर पोलीस पथकाने नमुद वाहनाचा शोध कसोशीने घेवुन वाहन शिवणे ते एखतपुर रोडवर पकडले . सदरचे वाहनात काय आहे


 याबाबत वाहनातील इसमांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याबाबत संशय आल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १ ) विमल पान मसाला निळा ४८४० पाकीटे किंमत ९ , ५८,३२० / - रु , २ ) विमल पान मसाला गुलाबी १००० पाकीटे किं . १,२०,००० / - रु , ३ ) विमल पान मसाला पिवळा १४०० पाकीटे २,६१,००० / -रु , ४ ) व्ही १ सुगंधीत तंबाखु निळा ४४०० पाकीटे किं . रु . ९ ६८०० / -रु , ५ ) व्ही १ सुगंधीत तंबाखु गुलाबी १०० पाकीटे किंरु ३०००० / - , ६ ) व्ही १ सुगंधीत तंबाखु पिवळा १४०० पाकीटे ४६२०० / - तसेच ७ ) महींद्रा पिकअप एमएच १२ एलटी ४३२८ किंरु ५,००,000 / - रु असा सर्व मिळुन २० , १३ , १२० / - रुचा ऐवज प्रतिबंधीत गुटखा पान मसाला सुगंधीत तंबाखु मावा इ . तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतु महाराष्ट्र राज्यामधुन उत्पादन वाहतुक साठा विक्री आदेशाचा भंग करुन कब्जात बाळगलेला मिळुन आला . 


लागलीच याबाबत अन्न औषध प्रशासनास याबाबत लेखी कळविल्याने श्री उमेश सुभाष भुसे सहा . आयुक्त यांचे कार्या . अन्न व औषध प्रशासन यानी येवुन पाहणी करुन सदर प्रकरणी चालक व इतरांविरुध्द सांगोला पोलीस ठाणेस तक्रार दिलेली आहे . त्याप्रमाणे आरोपी १. प्रविण दत्तात्रय खांडेकर रा . निजामपुर ता . सांगोला , २. चेतन दत्तात्रय खांडेकर रा . निजामपुर ता . सांगोला , ३. वाहन मालक , ४. मालाचे पुरवठादार बिपीन तेजवानी अथणी कर्नाटक तसेच ५ . साठा मालक दत्तात्रय खांडेकर कोथरुड सध्या स्वारगेट पुणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे . सदर गुन्हयाचा तपास मा . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम सोलापुर ग्रामीण , मा . अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साो सोलापुर ग्रामीण , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग तसेच 


पोनि . श्री सुहास जगताप सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. बाबासाहेब पाटील असे करीत आहेत . दि . १ ९ / ० ९ / २०२१ रोजी रात्री अन्न व सुरक्षा पथकाकडील श्री उमेश सुभाष भुसे सोलापुर यानी व त्यांच्याकडील पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्री ०८:00 वा वाकी शिवणे ता . सांगोला येथे एमएच १२ एएक्स १२४० या वाहनामधुन १८ , २४ , ९ ४० / - रुचा वेगवेगळया प्रकारचा प्रतिबंधीत गुटखा पान मसाला सुगंधीत तंबाखु मावा इ . तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतु महाराष्ट्र राज्यामधुन उत्पादन वाहतुक साठा विक्री आदेशाचा भंग करुन कब्जात बाळगुन वाहतुक करीत असताना छापा टाकुन पकडलेला आहे . त्याबाबत श्री उमेश भुसे यानी आरोपी बाबु धुळा काळे , मालाचे पुरवठादार बिपीन तेजवानी , वाहन मालक तसेच साठा मालक दत्तात्रय खांडेकर अशा आरोपींच्याविरुध्द तक्रार दिलेने गुन्हा दाखल झाला आहे . सदर गुन्हयाचा तपास मा . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते मॅडम सोलापर ग्रामीण मा अपर सांगोला पोलिसांनी 2 अवैध गुटक्याच्या वाहनासह 38 लाख 38 हजाराचा मुद्देमाल केला जप्त : पो.नि.जगताप पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सो सोलापुर ग्रामीण ,मा . उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम | मंगळवेढा विभाग तसेच पोनि . श्री सुहास जगताप सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोना . सुखदेव गंगणे असे करीत आहेत

Post a Comment

0 Comments