google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे येथे नालंदा बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न

Breaking News

नाझरे येथे नालंदा बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न

 नाझरे येथे नालंदा बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न


सांगोला  /बाबा वाघमारे ; सांगोला तालुक्यातील नाझरे येथील नालंदा बौद्ध विहारात पौर्णिमेचे औचित्य साधून जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नाझरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. दिपाली विजयकुमार देशमुख व माजी सरपंच श्री. विजयकुमार देशमुख या उभयतांच्या हस्ते करण्यात आली, तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य सौ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोधी वृक्षाचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.               बौद्ध विधी आयु. किशोरजी बनसोडे व आयु. मुरलीधर तोरणे यांनी संपन्न केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. शशिकांत पाटील, श्री. संजय सरगर, श्री. मधुकर आलदर, श्री. के आर वाघमारे ,श्री. जीवन कांबळे, माजी सरपंच श्री. शामराव वाघमारे ,माजी डे. सरपंच श्री.भारत शेळके, भाजप नेते श्री.नंदकुमार रायचुरे श्री. गोरख आदाटे, श्री. दिपकजी बनसोडे, पत्रकार श्री. बाबा वाघमारे, प्राचार्य श्री. प्रकाशराव परिचारक, श्री. बाळासाहेब काटे, श्री. दगडू काटे श्री, विनायक सरगर, श्री. मिलिंद चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवभूषण ढोबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री. मधुकर ढोबळे, श्री. लक्ष्मण ढोबळे,श्री. सुहास गडहिरे, पोलीस पाटील श्री. लक्ष्मण बनसोडे,श्री. अश्वजीत जाधव सर, मनोज ढोबळे, विराज ढोबळे, अमर ढोबळे, विजय ढोबळे, सिद्धार्थ ढोबळे, गणेश रोकडे, तथागत गडहिरे, अशोक सावंत, हेमंत पवार, मेघनाथ ढोबळे ,सम्राट सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विशाल परीहार यांचेतर्फे अल्पोपहार देण्यात आला शेवटीची गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

Post a Comment

0 Comments