google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा तर्फे माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील घटने संदर्भात मा . तहसीलदार यांना निवेदन सादर

Breaking News

बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा तर्फे माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील घटने संदर्भात मा . तहसीलदार यांना निवेदन सादर

बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा तर्फे माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील घटने संदर्भात मा . तहसीलदार यांना निवेदन सादर


 बहुजन समाज पार्टी, सांगोला विधानसभेच्या वतीने तालुका अध्यक्ष ॲड. सागर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत  माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात निवेदन देण्यात आले.

माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील         मातंग समाजाचे साठे परिवारातील सरपंच दशरथ साठे यांचे बंधू धनंजय साठे यांचा मृत्यू दिनांक 20/8/2021 रोजी झाले असता गावातील स्थानिक पोलीस प्रशासन व मनुवादी पुढारी यांच्या मदतीने तेथील काही मनुवादी मानसिकतेचे समाज कंटक, जातीयवादी गावगुंडांनी सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू न देता सुमारे 18 तास मृतदेह आडवून मृतदेहाची अवहेलना करून मानवतावादाला काळिमा फासणारे प्रकरण घडले आहे . 


सदरील प्रकरण लक्षात घेता बहुजन समाज पार्टी सांगोला यांचेतर्फे जातीयवादी, मनुवादी समाजकंटक, गावगुंडांवर ॲट्रॉसिटी व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून दोषीना कडक शासन करण्या संदर्भात मा. तहसिलदार  यांना बसपाचे तालुका अध्यक्ष ॲड. सागर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तर्फे निवेदन देण्यात आले.


 तसेच निवेदनातील मागणीचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून साठे कुटुबाला  न्याय द्यावा अन्यथा सांगोला बसपा विधानसभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही निवेदनाद्वारे  .मा. तहसिलदार यांना सांगण्यात आले आहे. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे,वि. बी व्ही एफ अमर सोनवले, श. अध्यक्ष संदीप बनसोडे, श. उपाध्यक्ष राजू माने,श. कोषाध्यक्ष अजित बनसोडे, माजी जिल्हा सचिव कुंदन बनसोडे, माजी वि.अध्यक्ष साईनाथ बनसोडे, माजी वि. अध्यक्ष कालिदास कसबे, माजी वि. महासचिव ॲड. आनंद बनसोडे, मिडीया प्रमुख शिरीष शिंदे, अजित वाघमारे, स्नेहल लोखंडे, दुर्योधन बनसोडे  तसेच शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments