अवघ्या एक हजार रुपयांसाठी भावाचा केला खून !
लातूर : अवघ्या एक हजार रुपयांसाठी भावाचाच खून करण्यात आल्याची घटना कासारजवळा येथे घडली . या घटनेत वैजनाथ आश्रुबा सुडके ( 30 , रा.कासार जवळा , ता.लातूर ) यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी गातेगाव पोलिसांनी नागनाथ सुडके ( 28 ) यास अटक केली असून त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली .
एक हजारांसाठी घेतले भावाचे प्राण लातूर तालुक्यातील कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दोघे सख्खे भाऊ आहे . धानमंत्री किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यावर वैजनाथ यांच्या खात्यावर जमा झाले होते . यातील एक हजार रुपये मला द्यावेत म्हणून नागनाथने वैजनाथकडे तगादा लावला . नागनाथ हा व्यसनी असल्याने वैजनाथने दोन हजारातील एक हजार रुपये नागनाथ यांच्या पत्नीकडे दिले . हे एक हजार मला न देता माझ्या पत्नीकडे कशासाठी दिले म्हणून नागनाथ सुडकेने 24 ऑगस्टरोजी रात्री 8.30 वाजता भांडायला सुरुवात केली .
भांडणात वैजनाथ यांच्या डोक्यात नागनाथने काठी घातली . या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैजनाथला कुटुंबीयांनी लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . दरम्यान , बुधवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्ह्यातील आरोपी नागनाथ सुडके याला ताडकी मार्गावरुन अंबाजोगाईकडे पायी जात असताना पोलिसांनी अटक केली . तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे करीत आहेत .


0 Comments