google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झिका’ प्रतिबंधासाठी काय आहे नियमावली वाचा

Breaking News

झिका’ प्रतिबंधासाठी काय आहे नियमावली वाचा

 झिका’ प्रतिबंधासाठी काय आहे नियमावली वाचा


पुणे - जिल्ह्यातील झिका विषाणू (Zika Virus) संसर्ग प्रतिबंधासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने स्‍वतंत्र अशी मार्गदर्शक नियमावली (Rules) तयार केली आहे. या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी शुक्रवारी (ता. ६) सर्व गावांना आणि आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संयुक्त सहीने हा आदेश काढला आहे.राज्यातील पहिला झिकाचा रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आढळून आल्याने, याच्या प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबतची ही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत झिका आजाराची लक्षणे व चिन्हे, या आजारांमुळे होणारी गुंतागुंत, निदान आणि उपचार कसे करावेत, ग्रामपंचायतींनी गाव पातळीवर काय कार्यवाही करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही करावी, अतिसंवेदनशील गावांनी काय केले पाहिजे, प्रवाशांनी कोणत्या बाबींचे पालन करावे आदींबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.नवी दिल्ली येथील राष्ट्रीय रोगनिदान संस्था आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू रोगनिदान संस्था (एनआयव्ही) येथे झिका आजाराच्या निदानाची मोफत सुविधा उपलब्ध आहे. डेंगीच्या रुग्णांप्रमाणेच झिका संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवावेत. या नमुन्यासोबत रुग्णाची संक्षिप्त माहिती देणारा फॉर्म भरून पाठवणे आवश्‍यक आहे.सध्या झिका रुग्णांवरील उपचारासाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करावेत. रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी, निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. तापासाठी पॅरासिटॅमोल गोळी किंवा औषध घ्यावे आणि ॲस्पिरीनसारख्या औषधांचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गावे आणि ग्रामस्थांनी काय करावे?

गावातील डास उत्पन्नाची स्थाने नष्ट करावीत

पाणी साठविण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या

घट झाकणाने झाकाव्यात

वापरात नसलेल्या वस्तू जसे नारळ कवटी, टायर्स यासारखे साहित्य काढून टाकावे

आठवड्यातून एकदा कुलर हे रिकामे व स्वच्छ करावे

पाण्याचे हौद, टाक्यांमध्ये गप्पी मासे

या गोष्टींचे पालन करावे

आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा

ताप आल्यास, त्वरित पॅरासिटॅमोल गोळी घ्यावी

घरी व दवाखान्यात मच्छरदाणीचा वापर करावा

फूल बाह्याचे व पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत

डास प्रतिबंधात्मक मलमांचा वापर करावा

काय करू नये

आपले घर व आजूबाजूचा परिसर अस्वच्छ ठेवू नये

घराजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी

घरातील कुलर, बकेट, फ्लॉवर पॉट, फ्रिज,

नारळ कवटीकडे दुर्लक्ष करू नये

वापरात नसलेल्या बाटल्या, जुने टायर्स, फुटकी भांडी घराच्या आजूबाजूस किंवा बाहेर टाकू नका

ताप आल्यावर ॲस्पिरीन गोळी घेऊ नका

स्वतः कोणतीही औषधे घेऊ नका

Post a Comment

0 Comments