भयानकवथरारक :कोरोना व क्वारंटाईनच्या भीतीने वडीलांचा मृतदेह चार दिवस लपवून ठेवला ;त्यानंतर दोघी बहिणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न , एकीचा मृत्यू !
कोरोना होऊन वडीलांचा मृत्यू झाल्याची शंका आल्याने दोन बहिणींनी आता आपल्याला क्वारंटाईन करतील या भीतीने वडीलांचा मृतदेह तब्बल चार दिवस घरात लपवून ठेवला व दोघींनीही आत्महत्येचा प्रयत्न केला , त्यामध्ये एकीचा मृत्यू झाला . ही दुर्दैवी व भयानक घटना मुंबईतील पश्चिम विरार येथील ग्लोबल टाऊनशीप मध्ये घडली . पश्चिम विरार येथील ग्लोबल सिटी टाऊनशीपमधील ब्रोकलीन अपार्टमेंटमधील कुटुंबात हा प्रकार घडला . श्री . सहरकर हे अन्न पुरवठा विभागातून सेवानिवृत्त झाले होते . त्यांना दोन अविवाहित मुली आहेत . पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते मागील आठवड्यातच भाड्याने येथे राहण्यास आले होते .दरम्यान १ ऑगस्ट रोजी सहरकर यांचे निधन झाले . त्यांच्या ४० वर्षीय मुलगी विद्या व ३६ वर्षीय स्वप्नाली या दोन मुलींना वडीलांचे निधन कोरोनामुळे झाल्याचा संशय आला . हे लोकांना समजले , तर आपल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाईल व येथे राहता येणार नाही अशी भीती वाटल्याने वडीलांचा मृतदेह घरातच ठेवला . मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी कापूर , डांबर गोळ्या तेथे ठेवल्या होत्या .दरम्यान १ ऑगस्ट रोजी सहरकर यांचे निधन झाले . त्यांच्या ४० वर्षीय मुलगी विद्या व ३६ वर्षीय स्वप्नाली या दोन मुलींना वडीलांचे निधन कोरोनामुळे झाल्याचा संशय आला . हे लोकांना समजले , तर आपल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाईल व येथे राहता येणार नाही अशी भीती वाटल्याने वडीलांचा मृतदेह घरातच ठेवला . मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी कापूर , डांबर गोळ्या तेथे ठेवल्या होत्या .


0 Comments