google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अखेर..विजयसिंह मोहिते-पाटील यांचा लढा विजयी.. विजयसिंह यांच्या अभ्यासूपणामुळे झाली अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत

Breaking News

अखेर..विजयसिंह मोहिते-पाटील यांचा लढा विजयी.. विजयसिंह यांच्या अभ्यासूपणामुळे झाली अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत

 अखेर..विजयसिंह मोहिते-पाटील यांचा लढा विजयी.. विजयसिंह यांच्या अभ्यासूपणामुळे झाली अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत


 विजयसिंह मोहिते-पाटील यांचा लढा अखेर विजयी..

 विजयसिंह यांच्या अभ्यासूपणामुळे झाली अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत. सोलापूर जिल्ह्यातील कार्यकुशल व अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून अकलूज माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते येथे नगरपंचायत स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली आहे. दरम्यान, तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 17 जुलै रोजी दिले होते. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अकलूज माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.अनेक दिवस संघर्ष केल्यानंतर गेल्या काही कालावधी मध्ये म्हणजेच 19 सप्टेंबर 2019 रोजी याबाबत पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले व अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होताया महत्वपूर्ण न्यायालयीन लढा अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड.अभिजित कुलकर्णी हे लढत होते व त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याला मंगळवारी न्याय मिळाला.हा विषय लवकरात लवकर सुटावा व या विषया मधील काही तांत्रिक अडचणी शासनामार्फत सोडविण्याकरिता त्यास सहकार्य मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशारी,उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून विनंतीही केली होती. या सर्व नेते मंडळींनी ही याबाबत कागदपत्रे तपासून सहकार्य करू असे आश्वासन दिले होते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गेली 43 दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. या उपोषणस्थळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही वेळोवेळी याबाबतचा शासकीय पाठपुरावा केला होता.

 माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना आज (बुधवारी) या तिन्ही ग्रामपंचायतींची सूत्रे देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना फक्त सहा महिने काम करण्यास मिळाले आहेत. आता नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी नव्याने प्रभाग रचना होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. एकूणच, माळशिरस तालुक्‍यात राज्य शासनाच्या या अधिसूचनेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीबाबत अंतिम अधिसूचना निघाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकलूज, नातेपुते माळेवाडी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नेतेमंडळींनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक फटाक्यांची आतषबाजी करीत आहेत. आणि आता काही महिन्यावरच निवडणुका आल्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागतील.

Post a Comment

0 Comments