मुंबईसह हिंदुस्थानातील 12 शहरे बुडणार , नासाचा धडकी भरवणारा अहवाल
ग्लोबल वॉर्मिंगच्या भयंकर परिणामांना सामोरे जाण्याचे संकट संपूर्ण जगावर ओढवणार आहे. याचा मुंबईसह हिंदुस्थानच्या किनारपट्टी भागातील 12 शहरांनाही तडाखा बसणार असून हिमनद्या वितळून ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत. पुढील जवळपास 80 वर्षांनी म्हणजेच सन 2100 पर्यंत हे प्रचंड हानीकारी नैसर्गिक संकट हिंदुस्थानसह संपूर्ण पृथ्वीतलावर हाहाकार उडवणार आहे. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्येला स्थलांतरित व्हावे लागणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने या धोक्याची घंटा वाजवली आहे.नासाने 'इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज'च्या (आयपीसीसी) अहवालाचा हवाला दिला आहे. याआधारे जगभरातील अनेक शहरे समुद्राच्या पाण्याखाली बुडणार असल्याचा इशारा दिला आहे.समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून हिंदुस्थानच्या किनारपट्टी भागातील 12 शहरे जवळपास 3 फूट पाण्यामध्ये बुडतील. वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळून सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण होईल, असे आयपीसीसीच्या अहवालात म्हटले आहे. सन 1988 पासून आयपीसीसीमार्फत जागतिक पातळीवरील वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास केला जात आहे. हे पॅनल दर 5 ते 7 वर्षांनी पर्यावरणासंबंधी आपला व्यापक अहवाल जारी करते. यावेळच्या अहवालातून ग्लोबल वॉर्मिंगची परिस्थिती अत्यंत भयानक बनणार असल्याचा इशारा दिला गेला आहे.या 12 शहरांना धोका समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका भयानक असेल. या धोक्याच्या सावटाखाली असलेल्या हिंदुस्थानी शहरांमध्ये मुंबईसह ओखा, विशाखापट्टणम, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मंगलोर, चेन्नई, तुतिकोरीन, कोच्ची, पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किडरोपोर किनारी भागाचा समावेश आहे.वातावरणातील गंभीर बदल1970च्या दशकापासून पृथ्वीचे तापमान वाढण्याचे प्रमाण अत्यंत झपाट्याने वाढले आहे.सन 2000 मध्ये वाढलेले तापमान हे मागील 50 वर्षांतील तापमान वाढीइतके भयंकर होते.2019 मध्ये नोंद झालेले वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.नासाने दिलेले धोक्याचे इशारे सन 2100 पर्यंत संपूर्ण जगाचे तापमान भयंकर वाढेल. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण वेळीच रोखले नाही, तर तापमानात सरासरी 4.4 अंश सेल्सियस इतकी वाढ होईल.पुढील 20 वर्षांत 1.5 अंश सेल्सियसने तापमान वाढून हिमनद्या वितळतील. त्यांचे पाणी मैदानी आणि सागरी भागांत प्रचंड हाहाकार उडवेल.समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून अनेक देशांच्या जमिनीचा भाग कमी होईल. समुद्राचा जलस्तर वाढण्याचा धोका रोखणे मुश्कील बनेल.हिमालयीन क्षेत्रात हिमकडे वारंवार कोसळून किनारी भागाला पुरासह अन्य भीषण संकटांना तोंड द्यावे लागेल.पुढील काही दशकांमध्ये वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण वाढेल. दक्षिणेकडे प्रत्येक वर्षी अधिकाधिक मुसळधार पाऊस कोसळत राहील
0 Comments