google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कडाडून विरोध! पाच तालुक्यात होणार कडक लॉकडाऊन, आज व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन;

Breaking News

कडाडून विरोध! पाच तालुक्यात होणार कडक लॉकडाऊन, आज व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन;

 कडाडून विरोध! पाच तालुक्यात होणार कडक लॉकडाऊन, आज व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन;


 पहा काय सुरू काय बंद अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह ५ तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑगस्टपासून हे नवीन असतील.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या नियमावलीला व्यापाऱ्यांनी मात्र, जोरदार विरोध केला असल्याचं समोर येत आहे. व्यापाऱ्यांनी विरोध करण्यासाठी पंढरपूर शहरात रस्त्यावर येत १० ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घंटानाद आंदोलन केलं. तसेच प्रदक्षिणा देखील मारल्या आहेत.संतप्त व्यापाऱ्यांनी सलग ३ दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, आता सर्व खुले करावे यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतानाच सोलापूरमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सलग दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.तर,व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील घंटानाद आंदोलन केलं. किमान यानंतर तरी सरकारला जाग यावी म्हणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि घंटानाद आंदोलन करत असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.१३ ऑगस्टला मात्र लॉकडाऊनचे आदेश झुगारून सर्व व्यापारी आपआपली दुकाने उघडी ठेवणार आज ११ ऑगस्ट रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे.त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून सलग ३ दिवस वेगवेगळी आंदोलनं होणार आहे. आणि १३ ऑगस्टला मात्र लॉकडाऊनचे आदेश झुगारून सर्व व्यापारी आपआपली दुकाने उघडी ठेवणार असल्याचं देखील व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान, आंदोलक व्यापाऱ्यांकडून पहिल्या दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असल्याचा दावा करत प्रशासनाने शहरावर लॉकडाऊन लादला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यात काय सुरु, काय बंद?

१) सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध

१३ ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहेत.

२) अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लागू

३)अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद असतील

४मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल

५) खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार

६) विवाह सोहळ्यास ५० ऐवजी २५ लोकांना परवानगी असेल

Post a Comment

0 Comments