google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात आढळला " एशियन टायगर ' ! " झिका'सह अनेक व्हायरसचा वाहक

Breaking News

सोलापुरात आढळला " एशियन टायगर ' ! " झिका'सह अनेक व्हायरसचा वाहक

 सोलापुरात आढळला " एशियन टायगर ' ! " झिका'सह अनेक व्हायरसचा वाहक डेंगी


 , मलेरिया , चिकुन गुनिया या रोगांबरोबरच " झिका व्हायरस'चा वाहक असलेला एशियन टायगर हा डास शहरातील गणेशनगर येथे नुकताच आढळला . सोलापूर : डेंगी, मलेरिया , चिकुन गुनिया या रोगांबरोबरच " झिका व्हायरस'चा वाहक असलेला एशियन टायगर हा डास  सोलापूर शहरातील पुणे नाका परिसरातील गणेश नगर येथे नुकताच आढळला आहे . सोलापूर शहरात सामान्यपणे आजपर्यंत क्युलेक्, एडीस व ऍनॉफेलेस  या जातीचेच डास आढळत होते . मात्र , एशियन टायगर हा अत्यंत धोकादायक व जीवघेणा डेंगीसारख्या रोगांचा प्रसारक असलेला डास शहरात आढळला आहे .यामुळे कोरोनापाठोपाठ  डेंगीच्या साथीची शक्यता असून , आरोग्य यंत्रणेसमोर एशियन टायगरचे आव्हान उभे राहिले आहे .  जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले विकासाचे नियोजन पावसाळा सुरू झाला की अनेक आजार सुरू होतात . पावसाचे साठणारे पाणी , अस्वच्छता , चिखल यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते . सोलापूर शहरात सांडपाणी वाहून जाण्याच्या सदोष यंत्रणेमुळे शहरभर डबकी साचलेली आहेत . अशातच शुक्रवारी रात्री सोलापूर शहरातील पुणे नाका नवीन पाण्याची टाकी परिसरातील गणेश नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये एका नागरिकाला एक वेगळाच डास आढळला . त्याने कुतूहल म्हणून या डासाचे फोटो काढले व आपल्या डॉक्टर मित्राला पाठवले . त्यांनी या डासाबद्दल अधिक माहिती घेतली असता , तो एडीस ऍलबिपिक्टस अर्थात एशियन टायगर डास या प्रजातीचा असल्याचे आढळले . हा डास सामान्य डासांपेक्षा चार ते पाचपट मोठा असून , डोळ्यांना अगदी सहज दिसतो . त्याच्यावर पांढरे पट्टे असल्यामुळे त्याला एशियन टायगर असे म्हटले जाते . हा डास सामान्यपणे दक्षिण आशियामध्ये आढळतो . तो डेंगी , मलेरिया , चिकुन गुनियासोबतच झिका व्हायरसचा देखील वाहक ठरू शकतो . शहरात जागोजागी स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असून त्या ठिकाणी पाणी साचते . त्याचबरोबर नाले , कचरा डेपो अशा ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे . सध्या राज्यात ठिकठिकाणी आलेला महापूर आणि संभाव्य अतिवृष्टी यामुळे संभाव्य साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी सोलापूर महापालिकेने तातडीने उपाययोजना करायला हव्यात ; अन्यथा कोरोनाप्रमाणे नव्या अन्य साथीच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते .सोलापुरात 360 संशयितांमधून 92 जणांना डेंगी ! महापालिका आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ महापालिका आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ सोलापूर शहरात आढळलेल्या या डासाबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता , सोलापूर शहरात प्रामुख्याने क्युलेक्स , एडीस आणि ऍनॉफेलेस या प्रजातींचे डास आढळतात असे सांगिण्यात आले . मात्र , सध्या एशियन टायगर प्रजातीचा हा डेंगीसोबत झिका व्हायरस रोगाचा वाहक असलेला डास शहरात वावरतोय याची महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कल्पना नाही . तर दुसरीकडे , सध्या शहरात डेंगीचे 92 रुग्ण उपचार घेत आहेत . महापालिकेचा सर्व्ह पारदर्शक आहे का ? महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या साथीच्या रोगांबद्दल माहिती घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले असून , याबद्दलचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे . शहरातील डेंगी , चिकुन गुनिया , मलेरिया या रोगांचे किती रुग्ण आहेत , शहराच्या कोणत्या भागात रुग्ण अधिक आहेत , तसेच साथीच्या रोगांना बळी पडणारासंभाव्य परिसर कोणता याचा सर्व्हे नुकताच झाला आहे . हा सर्व्हे संपूर्ण शहराचा आहे का व तो पारपदर्शक आहे का , असा प्रश्न या आढळलेल्या डासामुळे उपस्थित झाला आहे . एशियन टायगर डासाची वैशिष्ट्ये . झिका व्हायरस व डेंगीसारख्या प्राणघातक रोगांचा प्रसारक • माणसाच्या शरीरातून प्रथिने मिळेपर्यंत रक्त शोषण करतो , दीर्घ चावा घेतो • हा दिवसाही चावा घेतो त्यामुळे याच्यापुढे मच्छरदाणी निरुपयोगी ठरते अंगावर काळे - पांढरे पट्टे व सामान्य डासांपेक्षा चार ते पाचपट मोठा आकार ठळक बाबी . शहरी वसाहतींमध्ये सर्वांत जास्त आढळणारा रोग डेंगी बेडूक व गप्पीमाशांच्या कमी झालेल्या प्रमाणामुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव • खिडक्यांना जाळी व दरवाजांना जाळीदार पडदे लावणे हा एक उपाय • पावसाळ्यात पूर्ण शरीर झाकेल असे लांब बाह्यांचे कपडे वापरावेत

Post a Comment

0 Comments